शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेची धडक

By admin | Updated: July 24, 2014 23:39 IST

बुधवारी अतिवृष्टीच्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे सर्व्हे करावे. पडझड झालेल्या घरांना सानुग्रह अनुदान व कोलमडलेला वीजपुरवठा सुरु करा, या मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेनेने

अमरावती : बुधवारी अतिवृष्टीच्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे सर्व्हे करावे. पडझड झालेल्या घरांना सानुग्रह अनुदान व कोलमडलेला वीजपुरवठा सुरु करा, या मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांना सोपविले. सलग दोन दिवस शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वत्र महापूर नदीकाठच्या घरांची झालेली पडझड, गावात पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. त्यांना सानुग्रह अनुदान, शेत पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे, मृत कुटुंबियांना पाच लाखांची मदत द्यावी, मृत जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत करावी, नादुरुस्त झालेल्या पुलांची, रस्त्यांची डागडुजी आदी मुद्यांवर प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करावी आणि शासन परिपत्रकाप्रमाणे तत्काळ मदत करावी, तसेच सर्व नुकसानीचे पंचनामे करुन शासनाकडे अहवाल पाठवून नुकसानग्रस्त नागरिकांना भरीव आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यांबाबत तातडीने उपाययोजना करुन न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय बंड, नाना नागमोते, अमोल निस्ताने, आशिष धर्माळे, प्रवीण अळसपुरे, राहुल माटोडे, गजानन डोंगरे, अनिल नंदनवार, श्रीनिवास सरडे, पवन लुंगे, अनिल मोहोड, अविनाश सनके, धर्मेद्र मेहरे, सुरेश उताणे, अतुल थोटांगे, उमेश घुरडे, अशोक कैथवास, सचिन पिंजरकर, साहेबराव चौधरी, रवी सावरकर, विश्वास बुरघाटे, गोवर्धन अलोने, गंगाधर तरारे, प्रमोद कांबळे आदींचा सहभाग होता.