शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात तीन शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST

अमरावती : सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ)ने आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी जिल्हा ...

अमरावती : सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ)ने आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील तीन शाळांची निवड केली आहे.

राज्याच्या ग्रामीण व आदिवासी भागातील अतिमागास गावांना स्वयंपूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदर्श शाळा निर्मितीच्या परिपत्रकानुसार राज्यातील ३०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. शासनाच्या या उपक्रमाला पूरक उपक्रम म्हणून सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानांतर्गत जिल्ह्यातील किमान २ व कमाल ३ जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे धोरण व्हीएसटीएफने स्वीकारले आहे. या अंतर्गत पुढील एक वर्षात मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील जामली आर, धारणीमधील बेरदाबर्डा व चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी या शाळेत भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उपक्रम सुरू केले जाणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली २ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या बैठकीतील चर्चेनुसार बीडीओ व गटशिक्षणाधिकारी यांच्या पत्रानुसार व्हीएसटीएफच्या पाच तालुक्यांतील झेडपीच्या प्राथमिक शाळांचे पटसंख्येवर आधारित निकषानुसार पात्र शाळांची तपासणी करून याचा अहवाल १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर केला होता. त्याअनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या अहवाल, बीडीओ, गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रस्तावानुसार तसेच जिल्हा अभियान परिषदव्दारा पात्र शाळांची निवड करण्यात आली आहे. यात जामली आर, बेरदाबर्डा, विश्राेळी या शाळांचा समावेश आहे.

बॉक्स

जिल्हाधिकारी, सीईओकडून शिक्कामोर्तब

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानांतर्गत व्हीएसटीएफच्या गावातील आदर्श शाळेसाठी पात्र ठरलेल्या वरील तीनही शाळांच्या निवडीवर अभियानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा अभियान परिषदेचे उपाध्यक्ष तथा झेडपी मुख्यकार्यकारी अधिकारी अविशांत पांडा आदींनी शिक्कामोर्तब केले.