शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

पूर्णा प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: August 24, 2014 23:12 IST

तालुक्यातील पूर्णा प्रकल्पावरील इलेक्ट्रीशियनचे पद मागील १० वर्षांपासून रोजंदारीवर भरण्यात आल्याने धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुमित हरकूट - चांदूरबाजारतालुक्यातील पूर्णा प्रकल्पावरील इलेक्ट्रीशियनचे पद मागील १० वर्षांपासून रोजंदारीवर भरण्यात आल्याने धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील पूर्णा नदीमुळे जिल्ह्यातील ११० गावांची तहान शांत होते. सोबतच हजारो हेक्टर जमिनीचे सिंचन होते. पूर्णा नदीवर विश्रोळी येथे पूर्णा मध्यम प्रकल्प उभारण्यात आला. या धरणामुळे तालुक्यात हरितक्रांती झाली. मात्र, या प्रकल्पावर तांत्रिक कामकाजासाठी सुरेश माणिक धोटे (रा. घाटलाडकी) नामक एका इलेक्ट्रीशियनची नियुक्ती करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून ते धरणावरच काम करीत आहे. पूर्वी ७ वर्षे त्यांनी एका खासगी कंपनीत तांत्रिक काम केले. त्यांना पूर्णा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अगदी तोकड्या रोजंदारीवर कामावर घेतले. परंतु या धरणावर गलेलठ्ठ वेतनाची उचल करणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा अति महत्त्वाचे असलेले इलेक्ट्रीशियन हे पद अद्यापही रोजंदारी पगारावरच सुरू आहे. पूर्णा धरणावर ९० टक्के कामकाज हे विद्युतवर चालणारेच असून यामध्ये धरणाचे दरवाजे उघडणे-बंद करणे, विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरचा उपयोग तसेच विजेचा दाब हा कमी-जास्त होत असल्याने धरणावरील फ्युज नेहमी उडतात. यामुळे ही सर्व तांत्रिकी कामे धरणावर कार्यरत एकमेव कर्मचारी सुरेश धोटे मागील १० वर्षांपासून सातत्याने करीत आहेत. हलाख्याची परिस्थिती तसेच नवीन शिकण्याची जिद्द मनात असल्यामुळे मजबुरीत सुरेश धोटे हे काम करीत आहेत. दररोज सकाळी सायकलने ये-जा करणारे धोटे हे जीव मुठीत ठेऊन नियमित धरणावर पोहचतात. त्यांचा धरणावरील दीर्घ अनुभवामुळे स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यामुळे आजवर या धरणावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र अशीच स्थिती किती दिवस राहील, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.यावेळी धरणाचे दरवाजे २ मीटर उघडत असताना अचानक ४ नंबरच्या दरवाजाचा फ्युज उडाला. ही बाब सुरेश धोटे यांच्या लगेच लक्षात येताच त्यांनी अवघ्या दोन मिनिटांतच धावत जाऊन फ्युजची दुरूस्ती करून धरणावरील दरवाजा उघडण्यास सुरूवात केली. सुरेश धोटे यांच्या सतर्कतेने धरणावरील वाढत असलेली पाण्याची पातळी कमी करण्यास मदत मिळाली. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या जलसाठ्यात प्रमाणापेक्षा अधिक वाढ झाली होती. सुरेश धोटे यांनी सतर्कता बाळगली नसती तर कदाचित धरणातील पाण्याने अनेक गावे वाहून गेली असती. धरणावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच घेतलेला निर्णय तसेच धोटे यांच्या समयसुचकतेमुळे संभाव्य धोका टळला. या ५० वर्षीय सुरेश माणिक धोटे गेल्या १० वर्षांपासून रोजंदारी तत्त्वावर धरणावर इलेक्ट्रीशियन म्हणून काम करीत आहे. अगदी तोकड्या (५ हजार रुपये) पगारावर आपली उपजीविका भागवणारा हा तांत्रिकी कर्मचारी कधी शासनाचा कर्मचारी होणार तसेच वयोमर्यादेनंतर शासनातर्फे त्यास कोणती सुविधा देण्यात येईल, अशा अनेक प्रश्नांनी निरुत्तर झालेले सुरेश धोटे आज १० वर्षांनंतर इमानदारीने नोकरी करून ही शासकीय सुविधांपासून उपेक्षितच आहेत.