शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

शोध मराठी मनाचा संंमेलनाचा थाटात समारोप

By admin | Updated: January 4, 2016 00:09 IST

जागतिक मराठी अकादमी शोध मराठी मनाचा संमेलन २०१६ चा थाटात समारोप झाला.

अभिनेते विक्रम गोखले : उद्योजक अविनाश राचमाले यांची उपस्थितीअमरावती : जागतिक मराठी अकादमी शोध मराठी मनाचा संमेलन २०१६ चा थाटात समारोप झाला. गेल्या दोन दिवसांपासून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे साहित्यिक, उद्योजक, कवी, अभिनेते प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती तसेच सांस्कृतिक, सामाजिक राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची मांदियाळी या संमेलनात अवतरली होती. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष अभिनेता विक्रम गोखले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक अविनाश राचमाले (अमेरिका), माजी आमदार बी.टी. देशमुख, सुनील देशमुख, केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, उपाध्यक्ष यशवंतराव गडाख, गिरीश गांधी आदी उपस्थित होते. गेल्या दोन दिवस विविध कार्यक्रमाची बौध्दीक मेजवानी अमरावतीकरांच्या रसिकांनी नवोदित साहित्यिकांनी अनुभवली होती. एकाच व्यासपीठावर अनेक आपापल्या क्षेत्रातील यशस्वी नवरत्न अंबानगरीत अवतरल्यामुळे करीयर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की, मराठी भाषा व मराठी माणसाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, सर्व राजकीय लोकांनी विकासासाठी एकत्रीत येऊन काम केले तर ते भारताच्या विकासात महत्त्वाचे पाऊल ठरेल. सीमा रेषांवर देशातील प्रत्येक जाती-धर्माचा माणूस आपल्या सुुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून लढतो आहे. यामुळेच आपण सुरक्षित जीवन जगतो आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. तर मूळ भारतीय वंशाचे असलेले अमेरिकेत उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती प्राप्त आहे. असे अविनाश राचमाले म्हणाले की, भारतीय माणसाने कुठलाही प्रकारचा मणामध्ये इगो न ठेवता प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली पाहिजे. मराठी माणसाने जगभरात अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळविले आहे. प्रास्ताविक रामदास फुटाणे, तर संचालन सोमेश्वर पुसदकर यांनी व आभार निशांत गांधी यांनी मानले. (प्रतिनिधी)