शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाच्या दुकानांना सील

By admin | Updated: August 13, 2014 23:35 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सायंस्कोर मैदान येथे बचत गटाच्या माल विक्री केंद्रासाठी चार गाळे बांधले आहेत. हे गाळे ग्रामीण भागातून विविध महिला बचतगटांना त्यांनी

डीआरडीएची कारवाई : ११ वर्षांपासून होते बचत गटाचे विक्री केंद्रअमरावती : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सायंस्कोर मैदान येथे बचत गटाच्या माल विक्री केंद्रासाठी चार गाळे बांधले आहेत. हे गाळे ग्रामीण भागातून विविध महिला बचतगटांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी भाडे तत्त्वावर देण्यात आले होते. दरम्यान करार संपल्यानंतरही गाळे रिकामे न केल्यामुळे या विक्री केंद्राला सील ठोकण्यात आले आहे. प्रशासनाची ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप बचत गट केंद्र चालकांनी केला आहे.सायंस्कोर मैदानालगत असलेल्या जिल्हा परिषद वसाहतीच्या बाजूने ४ बचतगटाच्या उत्पादित माल विक्रीसाठी गाळे बांधले होते. सदर गाळे महिला व पुरुष बचत गटांना प्रतिमाह २५० रुपये भाडे तत्त्वावर सन २००९ मध्ये ११ महिन्यांच्या करारावर दिले होते. यात शिल्पकार पुरुष बचत गट (दाढी), सिद्धिविनायक महिला बचतगट (हरताळा) व अन्य दोन बचत गटांचा समावेश होता. ११ महिन्यांच्या करारानंतर गाळे प्रशासनाने विहित मुदतीत रिकामे करणे आवश्यक होते. मात्र आता पर्यंत या बचतगटांना केवळ नोटीशी बजाविण्यात आल्या. मात्र त्यापुढे कुठलीही कारवाई प्रशासनाने केली नाही. परिणामी बचतगट चालकांनी आपली बाजू प्रत्येकवेळी प्रशासनाकडे लेखी स्वरूपात कळविले असल्याचे बचतगट संचालकांचे म्हणणे आहे. अचानकच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणने नियामक मंडळाच्या बैठकीत हे गाळे रिकामे करण्याबाबतचा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सायंस्कोर मैदानालगतचे गाळे बचत गटांनी खाली न केल्यामुळे मंगळवारी या प्रतिष्ठानांना सील ठोकले आहेत. ही कारवाई जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्या आदेशावरून प्रकल्प संचालक के.एम. अहमद, गटविकास अधिकारी प्रमोद कापडे, नरेंद्र धारगे व डीआरडीएच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बचत गटांच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. एकीकडे शासनाने बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत. बचत गटांच्या उत्पादित माल विकता यावा यासाठी विविध ठिकाणी गाळे बांधण्यात आले. त्यानुसार सायन्सस्कोअर मैदानालगतचे गाळे बचत गटांनी भाडे तत्वावर घेतले होते. आतापर्यत या ठिकाणी बचत गट विक्री केंद्रांच्या माध्यमातून मिळालेल्या रोजगारावर कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होते. (प्रतिनिधी)