शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘स्क्रब टायफस’ जीवघेणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:48 IST

डेंग्यू, स्वाईन फ्लूसारख्या संसर्गजन्य आजारांनी आधीच अमरावतीकरांचा जीव मेटाकुटीस आला असताना....

ठळक मुद्देश्वसनाच्या लक्षणावरून रोगनिदान : ५० टक्के रुग्णांना लिव्हरचा त्रास

प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डेंग्यू, स्वाईन फ्लूसारख्या संसर्गजन्य आजारांनी आधीच अमरावतीकरांचा जीव मेटाकुटीस आला असताना ‘स्क्रब टायफस’ या नव्याच आजाराच्या दहशतीचे ढग दाटून आले आहे. कीटकापासून माणसात संक्रमित होणाºया या आजारात ५० टक्के रुग्णांना लिव्हरचा त्रास वा न्युमोनिया होतो. त्यामुळे निदान आणि योग्य उपचारच त्यावर नियंत्रण राखू शकतात.हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग विभागाच्या सहसंचालकांनी यासंदर्भात आरोग्य यंत्रणेला सजगतेचे निर्देश दिले आहेत. सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’चे रुग्ण आढळले असले तरी राज्याच्या अन्यत्र या आजाराने हातपाय पसरण्यापूर्वी त्याचे सर्वेक्षण, निदान व उपचार करावेत, असे निर्देश डीएचओ आणि महापालिकांच्या आरोग्य व्यवस्थेला मिळाले आहेत.राज्यात अद्यापपर्यंत स्क्रब टायफसने कुणाचाही मृत्यू ओढावलेला नाही. स्क्रब टायफस झालेल्या रुग्णांना कावीळ व श्वसनाचा त्रास होतो. ३५ टक्के रुग्णांना एआरडीएस होतो. काही लोकांना किडनीचा त्रास होतो. ३० टक्के लोकांमध्ये शरीरातील अनेक अवयव निकामी होतात. वेळेवर योग्य उपचार झाले नाही तर ५० टक्के रुग्ण दगावतात. २५ टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो. रक्त तपासणी करुन आणि श्वसनाच्या लक्षणांवरुन रोगनिदान करता येते.चिगर ‘नामक किटक चावल्यानंतर पाच ते वीस दिवांनी रोगाची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, मळमळ, ओकाºया आणि इतर ज्वरासारखी लक्षणे असतात. त्यामुळे बºयाच रुग्णांमध्ये मलेरिया, विषमज्वर किंवा डेंग्यू असण्याची शक्यता वर्तविली जाते. ज्या ठिकाणी चिगर चावतो त्या ठिकाणी एक व्रण असतो. त्याला हशर म्हणतात. हा आढळला की, रोगनिदान नक्की झाले, असे समजण्यात येते. परंतु ४० टक्के रुग्णांमध्ये हा हशर दिसत नाही. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान, लोकांचे जनजागरण आणि उंदरांवर नियंत्रण मिळवले तर स्क्रब टायफस आटोक्यात येवू शकतो. माईटसद्वारे पसरणाºया या कीटकजन्य आजाराबाबतच्या ‘गाइडलाइन्स’ आयएमएला पाठविल्या जाणार आहेत. गाइडलाइननुसार एखाद्या रुग्णामध्ये स्क्रब टायफस आणि रिकेटशियल आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांनी सरकारी आरोग्य यंत्रणेला त्याबाबतची माहिती देणे अभिप्रेत आहे.असा आहे उपचारडॉक्सिसायक्लिन अथवा अ‍ॅझिथ्रोमायसिनसारख्या अ‍ॅन्टी बायोटिक्सच्या योग्य वापराने या आजारावर उपचार करता येत असल्याचेही आरोग्य सेवा सहसंचालकांनी स्पष्ट केले आहे.ही चाचणी उपयुक्तवेलफेलिक्स : रक्ताद्वारे ही चाचणी करुन लक्षणानुसार आजाराचे निदान करता येणे शक्य आहे. निदानासाठी ही चाचणी ‘हेल्पफुल आहे. टेट्रॅसायक्लिन्स आणि क्लोरोमकिनिकॉल या थेरपीनुसार रिक्टेशिअल आजाराचे निदान केले जाते.आरोग्य सेवा सहसंचालकांनी पाठविलेले व रिकेटशियल आजाराच्या प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना, त्याबाबतच्या गाईडलाईन्स जिल्ह्यातील आरोग्य अधिकाºयांना पाठविण्यात आल्या आहेत.- सुरेश असोलेजिल्हा आरोग्य अधिकारीजि.प, अमरावती