शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल व्हॅनने घेतला अचानक पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:08 IST

परतवाडा : शहरातील मध्यवस्तीतील नेहरू मैदानावर रविवारी सकाळी ११.३० वाजता दरम्यान मैदानात उभी केलेल्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला. ...

परतवाडा : शहरातील मध्यवस्तीतील नेहरू मैदानावर रविवारी सकाळी ११.३० वाजता दरम्यान मैदानात उभी केलेल्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला. नगर परिषद कार्यालयाच्या बाजूला ही घटना घडली. ती आग तात्काळ अग्निशमन यंत्रणेने विझवली. काही कामानिमित्त साहेबराव गडीकर हे स्कूल व्हॅन घेऊन नेहरू मैदान येथे आले होते. वाहन उभे करून आवश्यक साहित्य खरेदीकरिता ते गेले असता, त्यांच्या एमएच २७ डी ०५८४ क्रमांकाच्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला. वर्दळीचे ठिकाण असल्याने नागरिकांना स्कूल व्हॅनमधून धूर निघत असल्याचे दिसताच त्यांनी एकच गर्दी केली. पालिकेच्या अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले.

बॉक्स

रेल्वे स्टेशन परिसरातील झुडपी जंगलाला आग

काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत आहे. परतवाडा - अमरावती महामार्गावरील रेल्वे स्टेशन परिसरातील झुडपी जंगलात शुक्रवारी रात्री आग लावण्यात आली. ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. अचलपूर नगरपालिकेच्या आगीचे दोन बंबानी ही आग आटोक्यात आणल्याची माहिती अग्निशमन अधिकारी संदेश जोगदंड यांनी दिली. पालिकेच्या अग्निशमन विभागाचे दीपक गणेश, उद्धव पुरी, संतोष कश्यप, गणेश नंदवंशी, जगदीश तिवारी, मयूर सहारे, अब्दुल मतीन आदींनी ही आग आटोक्यात आणली.