शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

खोजनपूरची शाळा भरली दुर्गादेवी मंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:53 IST

अचलपूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची दैनावस्था विद्यार्थीच नव्हे, शिक्षकांसाठीही तापदायक झाली आहे. दोन वर्षांपासून खोजनपूर येथे शाळा इमारतच नसल्याने गावातील दुर्गादेवी मंदिरात भरत आहे, तर खैरी आणि इंदिरानगर येथील शाळा समाजमंदिरात सुरू आहेत. तालुक्यात अनेक शाळांच्या वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून, नवीन वर्गखोल्यांची मागणी करूनही जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष पालकांमध्ये संताप निर्माण करीत आहे.

ठळक मुद्देवर्गखोल्या जीर्ण : नवे बांधकाम, दुरुस्तीचा झेडपीला विसर

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची दैनावस्था विद्यार्थीच नव्हे, शिक्षकांसाठीही तापदायक झाली आहे. दोन वर्षांपासून खोजनपूर येथे शाळा इमारतच नसल्याने गावातील दुर्गादेवी मंदिरात भरत आहे, तर खैरी आणि इंदिरानगर येथील शाळा समाजमंदिरात सुरू आहेत. तालुक्यात अनेक शाळांच्या वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून, नवीन वर्गखोल्यांची मागणी करूनही जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष पालकांमध्ये संताप निर्माण करीत आहे.जिल्हा परिषद अंतर्गत अचलपूर तालुक्यात १२९ शाळा, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत ११ हजार विद्यार्थी आणि ५२० वर्गखोल्यांची नोंद आहे. प्रत्यक्ष अनेक शाळांच्या वर्गखोल्या नादुरुस्त, पडक्या असून, नवीन वर्गखोल्यांची मागणी वारंवार करूनही जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारे ठरले आहे. मुकींदपूर, इसापूर, वाढोणा, इसेगाव, तुळजापूर जहागीर, देवरी, शिंदी बुद्रुक, खांबोरा, गोंडवाघोली, मेघनाथपूर, गोंडविहीर, बुरडघाट, पिंपळखुटा आदी गावांतील नादुरुस्त वर्गखोल्यांचे प्रस्ताव पाठविले; मात्र २६ जून रोजी शाळांची घंटा वाजूनही कुणाचेही लक्ष या बाबीकडे गेलेच नाही. गटशिक्षणाधिकारी कार्यालयानेही पाठपुरावा केलेला नाही.नवीन शाळा, वर्गखोल्या फाईलबंदखोजनपूर, खैरी, इंदिरानगर येथे नवीन इमारत आणि नारायणपूर, पायविहीर, भिलखेडा, खांजमानगर, येसूर्णा, नरसिंगपूर, जनोना येथे नवीन वर्गखोल्यांची मागणी आहे. अचलपूर पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे या प्रकरणाची फाइल दोन वर्षांपासून पडून आहे.मंदिर आणि शाळेची घंटा सोबतचखोजनपूर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आली. आता गावात नवीन शाळा इमारत होईल, ही नागरिकांची अपेक्षा फोल ठरली. मागील दोन वर्षांपासून गावातील शाळा दुर्गादेवी मंदिरात भरते. मंदिर आणि शाळेची घंटा सोबतच वाजते.पहिली ते पाचवीपर्यंत विद्यार्थी एकत्रखोजनपूर, खैरी, इंदिरानगर येथील शाळा मंदिर आणि समाजमंदिरात भरत असल्याने सर्व वर्ग एकत्र बसविण्यात येत आहे. खोजनपूर येथे पहिली ते पाचवीपर्यंत १७ विद्यार्थी आहेत. शाळा इमारत नसल्याने विद्यार्थिसंख्याही मोठ्या प्रमाणात रोडावली आहे.तालुक्यात काही शाळांच्या वर्गखोल्या नादुरुस्त आहे. नवीन शाळा इमारती आणि वर्गखोल्यांची मागणी करण्यात आली आहे. शाळा बंद न ठेवता त्या तीन ठिकाणी समाजमंदिर व मंदिरात सुरू आहेत.- रूपराव सावरकर, गटशिक्षणाधिकारी, अचलपूर