शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेवर वीज कोसळली, पाच विद्यार्थी जखमी; इमारतीचे नुकसान

By admin | Updated: September 19, 2015 00:00 IST

ऐन शाळा सुटण्याच्या वेळेत मुसळधार पावसासह शाळा इमारतीवर वीज कोसळल्याने पाच आदिवासी विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना...

मेळघाटच्या राक्षा गावातील घटनाचिखलदरा : ऐन शाळा सुटण्याच्या वेळेत मुसळधार पावसासह शाळा इमारतीवर वीज कोसळल्याने पाच आदिवासी विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना तालुक्याच्या राक्षा या गावात मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजता घडली. या घटनेत जखमी झालेल्या व भेदरलेल्या विद्यार्थ्यांवर हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन त्यांना सुटी देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.कन्हैय्या रामदास धांडे, जितेंद्र हिरालाल धांडेकर, अमोल सोनू शिंदे, राणी बिसराम दारसिंबे व सिंधू लक्ष्मण शनवारे सर्व (रा. राक्षा) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. नेहमीप्रमाणे शाळा भरली असताना अचानक मूसळधार पावसाला सुरुवात झाली आणि वीज कोसळली. यात शाळा इमारतीचे सुध्दा नुकसान झाले, अशी माहिती पंचायत समितीतर्फे देण्यात आली. पंचायत समिती सभापती दयाराम काळे यांनी या घटनेची संपूर्ण माहिती संबंधितांकडून मागविली आहे. दरम्यान या घटनेत काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची अफवा परिसरात पसरल्याने खळबळ उडाली होती. (तालुका प्रतिनिधी)हरिसाल आरोग्य केंद्रात उपचारशाळा इमारतीवर वीज कोसळताच इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत त्यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली. या घटनेमुळे मुख्याध्यापक पंकज कोदनकर यांनी अ‍ॅम्ब्युलन्स सेवेसाठी दूरध्वनी केला. मात्र, किमान तीन तास लागणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. अखेर गावकऱ्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. राक्षा येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली. त्यामध्ये पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर हरिसाल आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. यात कोणतीच जीवितहानी झाली नाही, ती केवळ अफवा होती. - आर. यू. सुरडकर, तहसीलदार, चिखलदरा.राक्षा येथील शाळेवर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता वीज कोसळली. त्यात काही विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत.- मनोहर गायकवाड, गटशिक्षणाधिकारी, पं.स. चिखलदरा