शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा

By admin | Updated: June 8, 2014 23:34 IST

खरीप हंगाम २0१४-१५ साठी जिल्ह्यात सोयाबीनसाठी सरासरी २,0१,२00 हेक्टर पेरणीक्षेत्र असताना किमान ३,७५,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. यासाठी कमीत कमी २ लाख क्विंटल बियाण्यांची

अमरावती : खरीप हंगाम २0१४-१५ साठी जिल्ह्यात सोयाबीनसाठी सरासरी २,0१,२00 हेक्टर पेरणीक्षेत्र असताना किमान ३,७५,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. यासाठी कमीत कमी २ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात एकूण गरजेच्या तुलनेत किमान १ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा यंदा जाणवणार आहे. महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्याकडे फक्त २५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याने इतर खाजगी कंपन्या किमान १ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करतील, अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने आतापासून सोयाबीनची चढय़ा भावात विक्री व काळाबाजार सुरू झाला आहे.जिल्ह्यात सोयाबीन बियाणे टंचाईचे सावट असल्याने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी २८ एप्रिल २0१४ रोजी सोयाबीन उत्पादन कंपन्यांची बैठक घेऊन उत्पादित बियाणे जिल्ह्यातच विकण्याचे आदेश या कंपन्यांना दिलेत. १५ ते २0 हजार क्विंटल  बियाणे उपलब्ध होऊ शकेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रत्यक्षात कृषी विभाग मात्र खासगी कंपन्यांकडून किमान एक लाख क्विंटल सोयाबीन, बियाणे उपलब्ध होईल तसेच महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्याकडून ३५ हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धी होऊ शकेल या वांझोट्या आशेवर आहे. सोयाबीनचे प्लॉटदेखील उगवणशक्तीच्या परीक्षेत नापास ठरले आहे. खरीपपूर्व आढावा सभेत राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यात ७८ हजार किलो बियाण्यांचा तुटवडा असल्याची जाहीर कबुली दिली. प्रत्यक्षात हा तुटवडा यापेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे सोयाबीनची चढय़ा भावात व काळाबाजारात विक्री होत आहे. याला पायबंद घालणे तूर्तास कृषी विभागाचे भरारी पथक सपशेल फेल झाले आहे.जिल्ह्यात १0४८ कृषी निविष्ठा केंद्रधारक आहेत. यासह वितरक व किरकोळ विक्रेत्यांनी एक लाख क्विंटलवर सोयाबीन बियाण्यांची मागणी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडे नोंदवली. प्रत्यक्षात मागणीच्या २५ टक्के पुरवठा खरिपाच्या तोंडावर झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.