शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

वरुड तालुक्यात सव्वादोन लाखांचे बनावट बियाणे जप्त

By admin | Updated: June 26, 2014 23:02 IST

कृषी विभागाच्या दक्षता पथकाने तालुक्यातील दोन कृषी साहित्य विक्री केंद्रावर धाड घालून २ लाख १५ हजार १८० रुपये किमतीचे बनावट बियाणे जप्त केले. ही कारवाई बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या

वरुड : कृषी विभागाच्या दक्षता पथकाने तालुक्यातील दोन कृषी साहित्य विक्री केंद्रावर धाड घालून २ लाख १५ हजार १८० रुपये किमतीचे बनावट बियाणे जप्त केले. ही कारवाई बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. दक्षता पथकाने बीजी-२ कपाशीच्या बियाण्यांचे २३० बनावट पाकिटे जप्त केली आहेत. याप्रकरणी वरुड पोलिसांनी औरंगाबादच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात घोराड येथे गत आठ दिवसांपूर्वी आर.आर.बी.टी कपाशी बियाणे विक्रेत्यावर कृषी विभागाने कारवाई केली होती. यामध्ये वरुड येथील शीतल कृषीसेवा केंद्र आणि जरुडचे रोशन कृषीसेवा केंद्रावर बनावट बीजी-२ कपाशी बियाणे विकली जात असल्याची कुणकुण दक्षता पथकाला लागली होती. यामुळे काही दिवसांपूर्वी माल विक्री बंद केली होती. परंतु २५ जूनच्या रात्री साडेआठ वाजतादरम्यान विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधिकारी जी.टी. देशमुख, कृषी विकास अधिकारी दिलीप काकडे, विभागीय गुणनियंत्रक निरीक्षक मनोहर पाटेकर, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक पुरुषोत्तम कडू, पंचायत समिती कृषी अधिकारी पंकज वानखडे, इमेज क्रॉप सायन्सेस कर्णूल (आ.प्र)यवतामळचे विभागीय व्यवस्थापक आशिष दाते, सचिन शहा यांच्या पथकाने हे धाडसत्र राबविले. यामध्ये जरुड येथील रोशन कृषी सेवा केंद्र येथे ५८ बी.जी कापूस बियाण्यांच्या ५८ बनावट पाकिटे आणि वरुड येथील शीतल कृषिसेवा केंद्रातून १७२ बनावट पाकिटे असे प्रती ४५० ग्रॅम वजनाची एकूण २३० पाकिटे जप्त करण्यात आली. जप्त केलेले कपाशी बियाणे हे बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. औरंगाबाद येथील प्राई अ‍ॅग्रो प्रा.लि.यांनी इमेज क्रॉप सायन्सेस कर्णूल (आंध्रप्रदेश) यांच्या डायमंड बी.जी-२ या कंपनीचे एस.आर.सी.एच-३३ या कपाशी वाणाची बनावट पाकिटे तयार करुन विक्रेत्याला विकण्यासाठी दिली. सदर कृषी दुकानदाराकडे रीतसर बिले आणि पावत्या असल्याने औरंगाबादच्या प्राई अ‍ॅग्रो प्रा.लि. विरुद्ध लेखी तक्रार नोंदविली. यावरुन वरुड पोलिसांनी औरंगाबादच्या प्राई अग्रो प्रा.लि. या कंपनीविरुद्ध भांविचे कलम ४२०, आर.डब्ल्यू ६३ कॉपीराईट अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)