शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सर्वशिक्षा अभियानाच्या बजेटला ‘हिरवी झेंडी’

By admin | Updated: September 14, 2016 00:18 IST

दरवर्षी लवकरच मंजूर होणारे सर्वशिक्षा अभियानाच्या बजेटला यंदा चक्क सप्टेंबर महिना उजाडला.

निर्णय : प्रस्ताव ८४ कोटींचा, मंजुरी ४१ कोटींचीजितेंद्र दखने अमरावतीदरवर्षी लवकरच मंजूर होणारे सर्वशिक्षा अभियानाच्या बजेटला यंदा चक्क सप्टेंबर महिना उजाडला. ८४ कोटी ९० लाख रूपयांच्या प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियान विभागाने एसपीएमपीकडे पाठविला होता. मात्र त्यापैकी ४१ कोटी ०८ लाख ८८ हजार रूपयांचे बजेट मंजूर करण्यात आले. त्यामधून ८ कोटी २५ लाख रूपयांचा निधीसुद्धा प्राप्त झाला आहे. परंतु उर्वरित निधी प्रत्यक्ष किती मिळणार, हे मात्र आताच सांगता येणार नाही.सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमासाठी कोट्यवधींची कामे प्रस्तावीत राहतात. परंतु अनेक प्रस्तावीत कामांसाठी निधी कमी पडत आहे. त्यामुळे शिल्लक निधीवरच समाधान मानण्याची वेळ सर्वशिक्षा अभियानावर आली होती. सर्व शिक्षा अभियानाचे मागील वर्षाचे बजेट सुमारे ७३ कोटी ६८ लाख रूपयांचे होते. यातून ५० टक्केच निधी जिल्ह्याला मिळाला होता. या निधीच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. काही उपक्रम राबविण्यासाठी निधीच प्राप्त झाला नाही. यंदा म्हणजेच सन २०१६-१७ साठी शिक्षण विभागाने सुमारे ८४ कोटी ९० लाख रूपयांचे बजेट महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे (एसपीएसपी) सादर केले होते. यासाठी वारंवार बैठकी, चर्चा आणि मुंबईवारी करण्याची वेळ सर्वशिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांवर आली होती. दरम्यान सप्टेंबर महिना उजाडला असून आता कुठे सुमारे ४१ कोटी ०८ लाख ८८ हजार रूपयांचे बजेट मंजूर केले आहे. या निधीतून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये विविध प्रकारचे बांधकाम, विशेष प्रशिक्षण, २५ टक्के प्रवेश शिक्षक प्रशिक्षण गणवेश, पाठपुस्तके, हंगामी वसतिगृह, विविध अनुदान, शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण आणि समावेशित शिक्षण, अध्ययन समृद्धी कार्यक्रम नवोपक्रमशील उपक्रम यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मात्र मंजूर निधी हा पूर्ण मिळत नसल्याने उपक्रम राबविताना अडचणी येत असल्याची खंतही व्यक्त होत आहे. यासाठी प्रयत्नाची गरज आहे.या बाबी कराव्या लागणार साध्यमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे (एसपीएसपी)यांच्याकडून बजेटला मंजुरी देण्यात आली आहे. ह्या गाईड लाईन सर्वशिक्षा अभियानातून साध्य कराव्या लागणार आहेत. यात प्रामुख्याने मुलांच्या गुणवत्तेत वाढ करणे, शाळा प्रगत करणे, शिक्षकांना गणित विषयात प्रगल्भ करणे, त्याचप्रमाणे स्पोकन इंग़्रजी विषयात प्रगल्भ करणे, शाळेचे स्वमूल्यमापन शाळा समृद्ध करणे आदी उद्धिष्ट अभियानातून करावे लागणार आहेत.सर्वशिक्षा अभियानातून शासनाने ठरवून दिलेले उपक्रम आणि काम केले जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे ८ कोटींंचा हप्ता मिळाला होता. यात विद्यार्थ्यांना गणवेश व इतर कामे केली आहेत. उर्वरित निधी प्राप्त होताच प्राधान्यानुसार कामे केली जातील.- एस.एम. पानझाडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक