फटका; ऑक्सिजन वाहतुकीसाठी टॅंकर घेतल्याचा परिणाम
अमरावती; जिल्ह्यात नायट्रोजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने कृत्रिम रेतन अडचणीत आले असून सीमेन वेळेत मिळत नसल्याने पशुपालकांचे टेन्शन वाढले आहे. नायट्रोजन वाहतूक करणारे टँकर शासन पातळीवरून ऑक्सीजन वाहतुकीसाठी वापरल्याने पुरवठा विस्कळीत होऊन कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. रोज साधारणपणे १८ ते २० टन लागणारी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. ऑक्सिजन आणण्यासाठी टँकर कमी पडत असल्याने प्रशासनाने नायट्रोजन पुरवठा करणारे सर्वच टॅंकर ऑक्सिजन वाहतुकीकडे वळवले आहेत. याचा परिणाम नायट्रोजनच्या पुरवठ्यावर झाला आहे. दर महिन्याला ४ ते ५ हजार लिटर नायट्रोजन जिल्ह्यातील लागते. सागर गॅस ही खासगी कंपनी जिल्ह्यातील नायट्रोजनाचा पुरवठा करते. कृत्रिम रेतनासाठीचे सिमेंट वापराआधी लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडून ठेवावे लागतात. डबल कोटेड क्रायोजनिक टँकर मधूनच नागपूर, औरंगाबाद,पूणे येथून नायट्रोजनाचा पुरवठा केला जातो. जिल्ह्यात दुग्धोत्पादन बऱ्यापैकी असल्यामुळे महिन्याला १ टॅंकर लागताे. पण सध्या टँकर नसल्याने ३० ते ३५ दिवसातून एक टॅंकर येत आहे. त्यामुळे दर १५ ते २० दिवसाला नायट्रोजन पोहोच होणारी यंत्रणाच विस्कळीत झाली असून रेतनाची प्रक्रिया लांबणीवर जात असल्याने पशुपालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बॉक्स
काय परिणाम होणार
गाय, म्हैस माजावर आल्यानंतर वेळेत त्याचे रेतन करावे लागते.अन्यथा भाकड काळ वाढून पुढील दूध उत्पादनास फटका बसू शकतो.
बॉक्स
अशी आहे किंमत
कुत्रिम रेतनासाठी एका सिमेनची किंमत शासकीय दवाखान्यात ४० रुपये तर खाजगी मध्ये १०० रुपये इतकी आहे.
बॉक्स
दरमाह साडेचार हजार कृत्रिम रेतन
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १०१ तर राज्यशासनाचे ६७ शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. दर महिन्याला साधारणपणे ४ हजार ते ४५०० हजार सिमेंट रेतनासाठी वापरले जातात.
कोट
टँकर अभावी नायट्रोजनच्या पुरवठा विस्कळीत झाल्याने कुत्रीम रेतनावर परिणाम होत असल्याने जास्त मागणी असणाऱ्या पशुवैद्यकीय केंद्रावरच नायट्रोजन पुरवठा करण्यास प्राधान्य दिले आहे. करारानुसार पुरवठा होणारच आहे. परंतु थोडा पुढे मागे होत आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. बी.एस.अस्वार
पशुधन विकास अधिकारी
जिल्हा कुत्रिम रेतन केंद्र