शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीतिरी साकारतेय लाल मातीच्या गणपती मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:16 IST

दिघी महल्ले तील तिसरी पिढी ने साकारला नवा ट्रेंड चाहूल बाप्पाच्या आगमनाची पर्यावरणपूरक मूर्ती : विसर्जनानंतर ...

दिघी महल्ले तील तिसरी पिढी ने साकारला नवा ट्रेंड

चाहूल बाप्पाच्या आगमनाची

पर्यावरणपूरक मूर्ती : विसर्जनानंतर शिघ्रगतीने विरघळते

फोटो आहे इंदलकडे

मोहन राऊत /धामणगाव रेल्वे : आपण प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू मातीच्या तयार केलेल्या गणपती मूर्ती बघितल्या. मात्र यंदा लाल मातीपासून विघ्नहर्त्याच्या मूर्तीचा नवा ट्रेंड दिघी महल्ले येथील कुंभार बांधवांच्या तिसऱ्या पिढीने साकारला आहे.

धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या तिरावरील अडीच हजार लोकवस्तीचे दिघी महल्ले येथे कुंभार बांधवांचे १५ ते २० कुटुंब राहतात. यातील दहा कुटुंब तीन पिढ्यांपासून गणपती मूर्ती तयार करण्याचे काम करतात. वझे नामक कुटुंबाची तिसरी पिढी गणपतीच्या मूर्ती बनवितात. ओंकार वझे त्यांचे बंधू श्रीकृष्ण, तर जानरावनंतर आता तिसरी पिढी ओमेश वझे मातीच्या गणपती मूर्ती गणपती तयार करण्याचे काम अखंडपणे करीत आहे.

बॉक्स

अशा होतात लाल मातीच्या मूर्ती तयार

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा विपरीत परिणाम मानवी जीवन शैलीवर होतो. शाडू मातीची किंमत अधिक आहे. त्यामुळे येथील कुंभार कुटुंबीयांनी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सावरगाव येथून लाल माती मार्च महिन्यात आणली. शंभर फुटाचा लाल मातीचा ट्रक नऊ हजार, तर दहा हजार रुपयांचा कलर लागतो. वझे कुटुंबीय साच्याऐवजी कलाकृतीला महत्त्व देत हातानेच मूर्ती तयार करीत आहे. ही प्रक्रिया मार्च महिन्यापासून तर रक्षाबंधनापर्यंत चालते. पावसाळ्यात मातीचा बचाव करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यंदा त्यांनी ऑरेंज कलरच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. गणरायाचं किरीट तेही सोनेरी आहे. काळी-पांढऱ्या रंगांनी डोळे बोलके बनले आहेत. सर्व मूर्ती सुंदर, सुबक आणि आकर्षक आहेत.

वर्धा- अमरावती जिल्ह्यात मागणी

लाल मातीपासून प्रथमच घरगुती गणपती मूर्ती तयार करण्याचा नवा ट्रेण्ड येथील कुंभार बांधवांनी आत्मसात केल्यामुळे ही पर्यावरणपूरक मूर्ती पाण्यात लवकर विरघळते. गणपती मूर्ती स्थापनापासून विसर्जनापर्यंत धार्मिक आनंदोत्सव साजरा करता येतो. त्यामुळे या लाल मातीच्या मूर्तीला वर्धा व अमरावती जिल्ह्यात मागणी वाढली आहे.

या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य

घरातच विसर्जन करता येते.

पाण्यात लवकर विरघळतात.

पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होत नाही.मातीचा पुनर्वापर करता येईल.

लाल मातीपासून गणपती मूर्त्या तयार करण्याचा नवा ट्रेंड यंदा आम्ही हाती घेतला आहे. सुबक व आकर्षक मूर्ती असून ही मूर्ती पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे.

- ओमेश वझे,

दिघी महल्ले

तीन पिढ्यांपासून आमच्या गावातील कुंभार बांधव मातीच्या मूर्ती तयार करतात. यंदा लाल मातीचा गणपती मूर्ती तयार केल्या. ही अभिमानाची बाब आहे.

- गोपिका चावरे,

सरपंच, दिघी महल्ले