शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सई फिरके राष्ट्रीय संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:15 IST

अमरावती : शांतीनगर येथील साक्षरा पॅराडाईज इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी सई अमरेंद्र फिरके हिची १९ वर्षांखालील राष्ट्रीय हँडबॉल संघात निवड ...

अमरावती : शांतीनगर येथील साक्षरा पॅराडाईज इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी सई अमरेंद्र फिरके हिची १९ वर्षांखालील राष्ट्रीय हँडबॉल संघात निवड झाली आहे. ४ ते १२ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धा पार पडली. यात तिने उत्तम प्रदर्शन केले. मुख्याध्यापिका व शाळा प्रशासनाने तिच्या यशाचे कौतुक केले.

-------------------

खालखोनी येथे दोन वर्गखोल्या मंजूर

भातकुली : तालुक्यातील खालखोनी येथे जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. उपसरपंच दिनेश खाडे, पप्पू देशमुख व नागरिकांनी याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांचे आभार मानले.

------------

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

परतवाडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दुपारी घरी एकटीच असलेल्या १५ वर्षीय मुलीवर २२ वर्षीय युवकाने अत्याचार केला. पोलिसात तक्रार दिल्यास जीव घेईन, अशी धमकी त्याने दिली होती. त्यामुळे तब्बल १४ दिवस तिने आई-वडिलांना सांगितले नव्हते. अखेर आई-वडिलांना सांगितल्यानंतर १८ सप्टेंबर रोजी तक्रार देण्यात आली. परतवाडा पोलिसांनी भादंविचे कलम ३७६ (३), ४५२, ५०६ तसेच पोक्सो अन्वये गुन्हा नोंदविला.

--------------

म्हसोना येथे विवाहितेचा विनयभंग

परतवाडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हसोना येथे २१ वर्षीय विवाहितेचा रावजी लालमन जामूनकर या ३५ वर्षीय इसमाने हात पकडला व तू मला आवडते, असे म्हणून विनयभंग केला. कोणाला सांगितले तर पाहून घेईन, अशी धमकीही दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

---------------------

पार्डी शिवारातून मोटरपंप लंपास

मोर्शी : तालुक्यातील पार्डी शिवारात विनोद मारोतराव खरपकर (४८) यांच्या शेतातील तीन एचपीचा मोटरपंप अत्रात चोरट्याने १६ सप्टेंबरच्या रात्री लंपास केला. मोर्शी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.