शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळांवर सहस्त्रनजर!

By admin | Updated: March 19, 2017 00:11 IST

महापालिका शाळांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला असून या शाळांची आता नियमित तपासणी केली जाईल.

तपासणी पथके : भौतिकगुणवत्तेची चाचपणीअमरावती : महापालिका शाळांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला असून या शाळांची आता नियमित तपासणी केली जाईल. यात शैक्षणिक गुणवत्तेसह शाळांची भौतिक गुणवत्ता तपासणी जाणार आहे.तूर्तास महापालिकेकडे ६२ शाळा असून त्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कमालीची माघारली आहे. शासन शिक्षणावर कोट्यवधी रूपयांचे निधी खर्च करत असताना महापालिका शाळांची दुरवस्था झाली आहे. शिक्षकाच्या खर्चावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मात्र बोटावर मोजण्याइतपत मर्यादित आहे. आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या शाळा दत्तक घेतल्या तरी परिस्थितीत बदल झाला नाही. विद्यार्थ्यांच्या अत्यल्प संख्येसोबत भौतिक सुविधांची वानवा आहे. गरीबांच्या शाळा म्हणून महापालिकेच्या शाळांना नवे नामानिधान मिळाले आहे. कोट्यवधी रुपयांचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ धूळखात आहे. ४० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १ ते १० पर्यंत मर्यादित आहे. तेथे शिक्षकांना रिकाम्या बाकाकडे पाहत ‘ड्युटी’ करण्याचे भाग्य मिळाले आहे. या पार्श्वभूमिवर या शाळांत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तसेच शाळांची भौतिक गुणवत्ता तपासणी हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी २१ अधिकाऱ्यांकडे ६२ शाळा सोपविण्यात आल्या आहेत. या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा संबंधित शाळांना भेटी देवून तेथील शैक्षणिक गुणवत्ता व शाळातील भौतिक गुणवत्ता तपासायची आहे. प्रत्येक तपासणी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३ शाळा देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)शैक्षणिक गुणवत्ता तपासणीशालेय भिंती बोलक्या आहेत का? ज्ञानरचनावादी पद्धतीने वर्गरचना व अध्यापन आहे का? विद्यार्थ्यांना वाचन करता येते का? लेखन करता येते का? शब्दापासून वाक्य किंवा अभिव्यक्ती करता येते का? संख्यालेखन, संख्येवरील क्रिया, पाढे, घड्याळाची वेळ अचूक सांगणे, या पद्धतीने शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी केली जाईल.या मुद्यावर भौतिक तपासणीवर्गखोली संख्या, ग्रंथालय, विद्युत व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, शौचालय, विद्यार्थी संख्या, शालेय पोषण आहार व्यवस्था, शिक्षक संख्या, शाळा कार्यालय, साफसफाई, मैदान, वेळापत्रक, शिक्षक हजेरी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळेची वेळ, इमारत, शाळेची दुरूस्ती, ई-लर्निंग सुविधा, याशिवाय शाळेच्या आवारात झाडे लावण्यास पुरेसी जागा आहे का? याची तपासणी केली जाईल.