शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पेरणीला मनाई

By admin | Updated: July 12, 2014 23:26 IST

बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. त्यावर सध्या काम सुरू असल्याने यंदा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पेरणी करण्यास रेल्वे प्रशासनाने

अमरावती : बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. त्यावर सध्या काम सुरू असल्याने यंदा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पेरणी करण्यास रेल्वे प्रशासनाने मनाई केली आहे. येत्या काही दिवसांतच येथे कारखाना निर्मितीचा शुभारंभ होईल, असे संकेत आहे. त्याअनुषंगाने रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पाहणी केली.तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळात बडनेऱ्यात रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना मंजूर करण्यात आला. हा कारखाना कोठे निर्माण करावा. त्यानुसार बडनेरा येथे रेल्वे परिसरालगतच्या जमिनींचा शोध घेण्यात काही महिने निघून गेले. अखेर पाचबंगला परिसरात रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना साकारण्यावर शिक्कामोर्तब झाले. सुमारे २५० कोटी रुपये खर्चून साकारला जाणाऱ्या या कारखान्याच्या निर्मितीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने पाटणा स्थित रेल्वेच्या बांधकाम विभागावर सोपविली आहे. एकूण १९६ एकर जमिनीवर उभारला जात असलेल्या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने जमीन हस्तांतरणाची रक्कम लाभार्थ्यांना वितरितसुद्धा केली आहे. प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे १५ कोटी ३२ लाख रुपये वर्गवारीनुसार वाटप करण्यात आले आहे. काही रहिवाशांची समस्या असून ती सोडविण्यासाठी रेल्वे युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. या कारखान्याचा श्रीगणेशा करावयाचा असल्याने मुंबई मध्य रेल्वे विभागाचे अभियंता मोहन नाडगे यांनी जागेची पाहणी केली आहे. पाहणीनंतरचा वस्तुनिष्ठ अहवाल नाडगे हे रेल्वे प्रशासनाला सादर करणार असल्याची माहिती आहे. आॅगस्ट महिन्यात रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे भूमिपूजन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे जागेबाबतची वस्तुस्थिती आणि पीक पेरणीसंदर्भात काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची माहिती आहे. हल्ली पावसाळा लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. मात्र या कारखान्यासाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीवर पेरणी करु नये, अशी नोटीस बजावून त्यांना अलर्ट करण्यात आले आहे. किंबहुना पेरणी केल्यास होणाऱ्या नुकसानीला स्वत: प्रकल्पग्रस्त जबाबदार राहतील, असे रेल्वेने म्हटले आहे. या कारखान्यासाठी लवकरच संरक्षण भिंत उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याकरिता अभियंता नाडगे यांनी बोरगावपर्यंत जमिनीची पाहणी केली आहे. या कारखान्याचे लवकर भूमिपूजन करण्यात यावे, याकरिता रेल्वे अर्थसंकल्पापूर्वी खा. अडसूळ यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)