शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

सा.बां. विभागच लागला रस्ते खोदायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:16 IST

पृथ्वी गोल आहे. त्यामुळे कोण केव्हा, कधी भेटेल, याचा काही नेम नाही आणि कधी कुणाला कुठले काम करावे लागेल, हेसुद्धा लिखित नाही. तसाच काहीसा प्रसंग शहरात सार्वजनिक बांधकाम विभागावर आला आहे.

ठळक मुद्देबरे करता ब्रह्महत्या : काम कुणाचे अन् करतयं कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पृथ्वी गोल आहे. त्यामुळे कोण केव्हा, कधी भेटेल, याचा काही नेम नाही आणि कधी कुणाला कुठले काम करावे लागेल, हेसुद्धा लिखित नाही. तसाच काहीसा प्रसंग शहरात सार्वजनिक बांधकाम विभागावर आला आहे. स्वत:च रस्ते खोदून घरगुती पाणीपुरवठा करणाऱ्यां पाईप लाईनची दुरुस्ती करून लाखो रुपये खर्चाचे रस्ते वाचविण्याचा बाका प्रसंग येथे आला आहे.अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या अथक प्रयत्नाने मिल स्टॉप ते बैतुल स्टॉपपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. कोट्यवधी रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आला. अमरावती, अकोला, बैतुल व इंदूर या आंतरराज्यीय महामार्गावरील संपूर्ण वाहतूक याच रस्त्याने ये-जा करते. परिणामी परतवाडा शहरातून दिवस-रात्र जड वाहतूक सुरू राहते. त्यामुळे झालेल्या चौपदरीकरणाच्या कामावरील रस्त्याची गुणवत्ता योग्य असताना काही ठिकाणी खड्डे पडू लागले आणि अधिकारी त्या खड्ड्यांचा शोध घेण्याच्या कामी लागले.सा. बां. नव्हे पाईप दुरूस्ती विभागराज्यभर खड्डेमुक्त रस्ते करण्याचे अभियान सुरू असताना, परतवाडा शहरातील रस्ता चौपदरीकरणात विद्युत वितरणच्या कार्यालयापुढे रस्ता दबल्याने मोठा खड्डा पडला होता. खड्डा भरल्यानंतर पुन्हा तीच स्थिती. परिणामी दोष कुठले आहे, पाणी कुठे मुरते याचा तपास करण्याचे आव्हानच सा.बां. विभागापुढे आले व उपविभागीय अभियंता प्रमोद भिलपवारसह यंत्रणा व कंत्राटदार कामाला लागले. लाखो रुपये खर्चून तयार केलेला त्यांचा रस्ता त्यांनाच स्वत: ठिकठिकाणी खोदावा लागला. कारण रस्त्याखालून घरगुती पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन ठिकठिकाणी गेल्या आहेत. त्या जुन्या झाल्यामुळे सडल्याने त्यातून पाणी झिरपून रस्त्यावर खड्डे पडत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्याची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची असली तरी लाखोंचा रस्ता खराब होत असल्याने पाईप दुरुस्तीचे कार्य सा.बां. विभागाला आता करावे लागत आहे. मात्र, या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे.घरगुती पाईप लाईनमुळे रस्त्याखाली लिकेज आहेत. त्यामुळे काही ठिकाणी सतत मोठे खड्डे महामार्गावर पडतात. आता लिकेज शोधून दुरुस्तीचे काम केले जात आहे.- प्रमोद भिलपवार,उपविभागीय अभियंता, सा.बां. विभाग, अचलपूर