शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासला सहा कोटींचा भार

By admin | Updated: February 17, 2017 00:28 IST

सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया सुरू असलेल्या जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीचे

जिल्हा परिषद ५९ गटांची सार्वत्रिक निवडणूक : ४ कोटी ३३ लाखांचे अनुदान वितरित गजानन मोहोड  अमरावतीसार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया सुरू असलेल्या जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीचे ८८ गणांसाठी ४० रुपये प्रतिमतदारप्रमाणे ५ कोटी ५६ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा भार ग्रामविकास विभागावर पडला आहे. सद्यस्थितीत ४ कोटी ३२ लाख ३८ हजार ८५० रुपयांचे अनुदान जिल्ह्यास जानेवारीअखेर वितरित करण्यात आले आहे. साधारणपणे ३२ रुपये प्रतिमतदारप्रमाणे कार्यालयीन खर्चाचे अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. उर्वरित अनुदान लवकरच मिळण्याची शक्यता जिल्हा निवडणूक विभागाने व्यक्त केली आहे. दोन वर्षांपूर्वी थकीत अनुदान न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या तहसीलदार संघटनेद्वारा ग्राम पंचायत निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला होता. निर्देशाचे उल्लंघन म्हणून राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व तहसीलदारांचे निलंबन रातोरात केले होते. यावर चर्चेंअंती तोडगा निघाल्याने सर्व तहसीलदारांचे निलंबन मागे घेण्यात आले. यावेळी पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे ग्रामविकास विभागाने मतदार यादीच्या कार्यक्रमासाठी तसेच प्रभाग रचनेबाबतचे नकाशे तयार करणे व इतर अनुषंगिक कामासाठीव त्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यालयीन खर्चासाठी प्रत्येक जिल्ह्यास १५ लाख रुपये २६ आॅक्टरोंबर २०१६ रोजी उपलब्ध केले व निवडणूक प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या खर्चासाठी राज्याला ११४ कोटी ३० लाख ८७ हजार ३०० रुपये उपलब्ध केले आहेत. यामध्ये जिल्ह्याच्या वाट्याला ४ कोटी १७ लाख ३८ हजार ८५० रुपये आले आहेत व यापूर्वी मतदार यादी व प्रभागरचना आदीसाठी मिळालेले १५ लाख रुपये असे एकूण ४ कोटी ३२ लाख ३८ हजार ८५० रुपये जिल्ह्यास ग्रामविकास विभागाने दिले आहेत व मतदार संख्येच्या प्रमाणात व कार्यालयीन खर्च वगळता प्रति मतदार ३२ रुपयाप्रमाणे हे अनुदान सर्र्व तालुक्यांना वितरित केले आहे. १४ जून २०१६ च्या निर्णयान्वये ग्राम विकास विभागाने अनुदान वितरित केला.