शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

८.१९ कोटी रुपयांवर स्थिरावला करमणूक कर

By admin | Updated: December 26, 2015 00:23 IST

विभागाच्या पाचही जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा महसुलावर विपरीत परिणाम झाला आहे.

२२ कोटींचे लक्ष्य : अमरावती विभाग माघारलाअमरावती : विभागाच्या पाचही जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा महसुलावर विपरीत परिणाम झाला आहे. २०१५-१६ मध्ये विभागातून करमणूक शुल्कातून २२ कोटी रुपये मिळविण्याचे उद्दीष्ट असताना डिसेंबर अखेर सरकारी तिजोरीत केवळ ८.१९ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित ३ महिन्यात तब्बल १४ कोटींची वसुली करण्याचे महाकाय आव्हान महसूल विभागासमोर उभे ठाकले आहे. करमणूक शुल्क वसुलीने विभागातील पाचही जिल्हे माघारले आहेत. चित्रपटगृह, केबल संचालक, टुरिंग टॉकीज, व्हिडीओ पार्लर, व्हिडीओ गेम आदींकडून महसूल प्रशासन करमणूक कराची वसुली करते. मल्टिप्लेक्सलासुद्धा करमणूक कर भरावा लागतो. विभागात १ मल्टिप्लेक्स, ५४ चित्रपटगृह अािण ७ टुरिंग टॉकीज आहेत. याशिवाय जिल्हास्तरावर केबल वाहिन्या आहेत. सन २०१५-१६ साठी विभागाला २२ कोटी करमणूक कराचे उद्दिष्ट होते. डिसेंबर मध्यावधीपर्यंत ८.१९ कोटींचा कर वसूल करण्यात आला. वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत वसुलीची टक्केवारी ९०.५६ टक्के कर वसुली झाली होती. मार्चअखेर मिळाले होते १४.५३ कोटी२०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी विभागाला १६.०५ कोटी रुपये करमणूक कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च २०१५ अखेर विभागातून १४.५३ कोटी रुपयांची करवसुली करण्यात आली. यात अमरावती जिल्ह्यातून ५.२५ कोटी, अकोल्यातून ४.६० कोटी, वाशीम ९५ लाख, यवतमाळ २.३० कोटी तर बुलडाण्यातून २.३० कोटी रुपये करमणूक कर रुपात प्राप्त झाले होते. सेट टॉप बॉक्सने वाढणार कर३१ डिसेंबर २०१५ पर्यंत जिल्ह्यात सेट टॉप बॉक्स बसविणे बंधनकारक आहे. सेटटॉप बॉक्समुळे झाकलेले केबल कनेक्शन बाहेर पडेल आणि त्यामुळे करमणूक करात वाढ होणार आहे.