शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३० एकरांतील सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 20:27 IST

पावसाअभावी हे सोयाबीन वाळले होते. त्यामुळे दुबार पेरणीकरिता कृषी विभागाच्या सर्वेक्षणाविनाच या शेतक-याने पीक मोडून काढले. 

टाकरखेडा संभू (अमरावती) : पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्याने चांदूरबाजार तालुक्यातील लसनापूर येथील एका शेतकºयाला ३० एकर सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवावा लागला. पावसाअभावी हे सोयाबीन वाळले होते. त्यामुळे दुबार पेरणीकरिता कृषी विभागाच्या सर्वेक्षणाविनाच या शेतक-याने पीक मोडून काढले. मान्सूनच्या सुरुवातीपासूनच पाऊस उशिरा पडला. त्यामुळे उशिरा पेरणी सुरू झाली. परंतु, पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला. भातकुली व चांदूरबाजार तालुक्यात भीषण परिस्थिती असल्याने लसनापूर येथील आकाश खुरद या शेतकºयाने ३० एकरांतील सोयाबीन मोडले. त्यांनी ३ जुलै रोजी पेरणी केली होती. याकरिता अंदाजे एक लाख रुपये खर्च आला होता. पावसाच्या प्रतीक्षेत सोयाबीनची वर आलेली पिके वाळू लागली होती. त्यामुळे येणाºया पावसाचाही आता काहीच उपयोग झाला नसता. अखेर सदर शेतक-याने ३० एकरावरील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरविला. यापूर्वी त्यांनी परिसरातील कृषी सहायकालादेखील माहिती दिली होती. परंतु, सर्वेक्षणासंदर्भातील कोणत्याच प्रकारचे आदेश नसल्याचे सांगून त्यांनी हात वर केले. त्यामुळे अखेर या शेतकºयाने पिकावर ट्रॅक्टर फिरविले. कृषी विभागाचे सर्वेक्षण नाही जिल्हास्तरावरून तालुका कृषी अधिकाºयांना पीक स्थितीसंदर्भातील अहवाल मागितला आहे. परंतु, लसनापूर शिवारात कोणतीही पाहणी वा सर्वेक्षण झालेले नाही.

टॅग्स :Amravatiअमरावती