शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केंद्रावर गर्दी झाल्यास संक्रमणाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST

अमरावती : ऑनलाईन नोंदणी केलेल्या तरुणांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण व पूर्वी लस घेतलेल्या ज्येष्ठांना दुसरी मात्रा असे नियोजनपूर्वक ...

अमरावती : ऑनलाईन नोंदणी केलेल्या तरुणांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण व पूर्वी लस घेतलेल्या ज्येष्ठांना दुसरी मात्रा असे नियोजनपूर्वक लसीकरण स्वतंत्र केंद्रांवर करण्यात येत आहे. मात्र, लस मिळावी म्हणून नोंदणी न झालेल्यांनी उगाच लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. यामुळे संक्रमणाचा धोका असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी सांगितले.

जिल्ह्यातील लसीकरण तसेच शासकीय व खासगी रुग्णालयातील स्थिती व आवश्यक उपाययोजनांबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

लस ही सर्वांनाच दिल्या जाणार आहे. प्रत्येक केंद्राला दोनशे डोस देण्यात येतात आणि हे डोज नोंदणी झालेल्यांनाच वापरले जातात. याचा सकृतदर्शनी डेटा ठेवला जातो. लसीकरण केंद्रावर टोकन पद्धतीने नंबर लावला जाते. टोकण सुरळीत वितरित होण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले.

बॉक्स

उपचार सुविधांत वाढ करण्याचे निर्देश

ग्रामीणमध्ये संसर्ग वाढत आहे. त्यामुळे तालुका व ग्रामीण परिसरातील रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सर्व कोविड केअर सेंटरची क्षमता तपासून आवश्यक तिथे खाटा वाढवाव्यात. खासगी रुग्णालयांनीही याप्रकारे उपचार व्यवस्थेत वाढ करावी, असे ते म्हणाले.