या परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उद्घाटक म्हणून सचिव शेषरावजी खाडे, तर प्रमुख वक्ते म्हणून अ.भा.शिक्षण हक्क परिषद नागपूरचे अध्यक्ष रमेश बिजेकर, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी. वडते, डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालयाचे प्राचार्य रा.ना.फुलारी विचारपीठावर उपस्थित होते. प्राचार्य जे.डी.वडते यांनी प्रास्ताविक करून शिक्षण हक्क परिषदेच्या आयोजनामागील महत्त्वपूर्ण भूमिका विशद केली. प्राचार्य रा.ना.फुलारी यांनी प्रमुख वक्ते यांचा परिचय करून दिला. प्रमुख वक्ते रमेश बिजेकर यांनी नव्या शैक्षणिक धोरणाची संकल्पना समजावून सांगताना त्याचे स्वरुप, त्यातील उणिवा, दोष, मर्यादा यावर परखडपणे भाष्य केले. हर्षवर्धन देशमुख यांनी सभागृहाशी संवाद साधून नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात आली. यावेळी संस्थेचे आजीवन सभासद, जनता शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, परिसरातील शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी, शिक्षणप्रेमी मंडळी, शिक्षक, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शेंदूरजन्यात शिक्षण हक्क परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:10 IST