शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

चिखलदरा पर्यटन महोत्सवासाठी आढावा बैठक

By admin | Updated: January 25, 2016 00:31 IST

मेळघाटातील पर्यटन वाढीसाठी येत्या ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास ...

पूर्वतयारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक उपस्थित राहणार, नृत्य, संगीताची मेजवानीअमरावती : मेळघाटातील पर्यटन वाढीसाठी येत्या ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, चिखलदरा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा येथील पोलीस कवायत मैदानावर चिखलदरा पर्यटन महोत्सव २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमत्ती दिली आहे. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे, वन व पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, खासदार, स्थानिक व सर्व आमदार, पर्यटन सचिव, पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीला नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, उपनगराध्यक्ष रेशमा परवीन शेख महेबूब, नगरसेवक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नेवस्कर, उपविभागीय अधिकारी राठोड, विभागीय वन अधिकारी वानखडे, युवराज, मुख्यधिकारी सुमेध अलोने, उपअभियंता आशुतोष शिरभाते, प्रभारी तहसीलदार एन.डी.बेंडे, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, हॉटेल ओनर्स संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.अप्पर जिल्हाधिकारी परदेशी म्हणाले की, महोत्सव काळात रंगारंग कार्यक्रमाची धमाल राहणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी रांगोळी रेखाटन व पतंग बाजी, उद्घाटन समारोह, विविध साहसी उपक्रम, पॅरासेलिंग, व्हॅलिक्रॉसिंग, रॉकक्लायडींग, पदभ्रमण, घोडा व उंट सफारी, गाविलगड किल्ल्यात लाईट अ‍ॅन्ड साऊंड शो, रात्री ७ ते १० पर्यंत रंगवेध हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिला आहे. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी विविध साहसी प्रकारासह दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूरद्वारा सुरेखा पुणेकरद्वार प्रस्तुत नटरंगी नार ही लावणी तसेच ७ फेब्रुवारीला मेळघाट मॅराथॉन स्पर्धा, सकाळी विविध सहासी उपक्रम, 'चला हवा येऊ द्या फेम'चे कलाकार भरत गणेशपुरे व सागर करंडेद्वारा प्रस्तुत हलकं फुलकं हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. ८ फेब्रुवारी रोजी हिंदी मराठी हास्य कवी संमेलन होणार आहे.चिखलदरावासीयांच्या दृष्टीने हा भाग्याचा क्षण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचे महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हा नियोजन समितीकडूुन आठवडाभरात निधी मिळणार आहे. सिडको व एमआयडीसी संघटनांचा ही यात सहभाग मिळणार आहे. सुमारे ३० ते ३५ स्टॉल उभारण्याचे नियोजन आहे. याबाबत विविध विषयावरसुध्दा चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)