अमरावती/संदीप मानकर
लॉकडाऊनमध्ये लाचखोरीच्या प्रमाणात वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये काही प्रमाणात घट झाली. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा येथे लाचलुचपत विभागाने सापळा रचून यंदा ८५ एसीबी ट्रॅपमध्ये १२० आरोपी अडकविले. यात सर्वाधिक लाचोखोरीचे प्रमाण महसूल व पोलीस खात्यात आढळून आले.
२०२० मध्ये लाच खाण्यात अमरावती विभागात पोलीस खाते अव्वल स्थानी होते. यात २४ ट्रॅपमध्ये ४० आरोपी अडकले आहे. यामध्ये सर्वाधिक सात ट्रॅप हे यवतमाळ जिल्ह्यात झाले. दुसऱ्या क्रमांकावर महसूल खात्यात १७ एसीबी ट्रॅपमध्ये २० आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर वनविभाग पाच, पंचायत समिती आठ, तर सहकार, महावितरण, प्रत्येकी तीन ट्रॅप व इतर ट्रॅपमध्ये अन्य विभागाचा समावेश आहे. २०२० मध्ये अमरावती जिल्ह्यात २५ ट्रॅप, अकोला १६, यवतमाळ १६, बुलडाणा १४ व वाशिम जिल्ह्यात १४ ट्रॅप यशस्वी झाले.
बॉक्स:
तिशीतील सरकारी बाबूंना सर्वाधिक पैशाचा मोह
१) २५ ते ३० वर्षे वयोगटातील सरकारी बाबू या ट्रॅपमध्ये अधिक संख्येने अडकल्याचे एसबीच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. गतवर्षी लॉकडाऊन असतानाही एसीबीची अधिकाऱ्यांवर नजर होती. मात्र, २०१९ च्या तुलनेत ट्रॅपमध्ये घट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
२) २०२१ या वर्षात यंदा १ जानेवारी ते १५ मार्च दरम्यान एकूण १५ एसीबी सापळे अधिकाऱ्यांनी यशस्वी केले. यात २० आरोपींचा समावेश आहे. यंदा अमरावती सहा, अकोला एक, यवतमाळ दोन, बुलडाणा चार व वाशिम जिल्ह्यात दोन ट्रॅपचा समावेश आहे. अडीच महिन्यांत महसूल विभागात दोन, पोलीस विभागात तीन ट्रॅप यशस्वी झाले.
असे आहे वर्षानिहाय ट्रॅप
२०१९ -१०३
२०२०-८५
२०२१-१५
कोट
२०१९ मध्ये अमरावती विभागात १०३ ट्रॅप यशस्वी झाले. मात्र गत वर्षी लॉकडानमुळे ट्रॅपमध्ये घट झाली. यंदा अडीच महिन्यात १५ ट्रॅप झाले. कुणी लाच मागत असेल तर नागरिकांनी तक्रार नोंदविण्यास पुढे यायला हवे, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.
- विशाल गायकवाड, पोलीस अधीक्षक, एसीबी अमरावती