शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

परतवाडा, चांदूरबाजारचे एसटी डेपो टाकणार कात

By admin | Updated: June 24, 2016 23:58 IST

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या परतवाडा आणि चांदूरबाजार बस आगाराचा कायापालट होणार आहे.

विकासाची नांदी : बच्चू कडूंनी केली पाहणीपरतवाडा : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या परतवाडा आणि चांदूरबाजार बस आगाराचा कायापालट होणार आहे. आ.बच्चू कडू यांच्या विशेष प्रयत्नातून यासाठी अडीच कोटी रूपये मंजूर झाले आहेत. गुरूवारी त्यांनी अधिकाऱ्यांसह बसस्थानकाची पाहणी केली. या आगारात छोटे उद्यान, प्रवाशांना बसायला जागा, खरेदीसाठी मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पार्किंग झोन तयार करण्यात येईल. गुरुवारी जवळपास दोन तास त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. याआधी या दोन्ही आगारांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. आता हा संपूर्ण परिसर हा स्वच्छ झाला आहे. आ. बच्चू कडू यांनी या आगारांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केलेत. त्या अनुशंगाने यासाठी तब्बल २.५० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. आगाराच्या आधुनिकीकरणाचे कामे लवकरच सुरु होईल. जुन्या इमारतीचे नूतनीकरण, गाड्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल, सुटसुटीत व प्रवाशांच्यादृष्टीने आखणी करण्यात आली असून आगारात एका वेळी १० गाड्या उपलब्ध राहणार आहेत. आगाराचे परिसरात उद्यानाचे बांधकाम करण्यात येणार आहे. याबैठकीमध्ये विभाग नियंत्रक राजेश अडोकार, रा.प. मंडळाचे स्थापत्य अभियंता खोडेकर, रामटेके, परतवाडयाचे आगारप्रमुख अनंत ताटर व वाहतूक निरीक्षक मिथून शर्मा यांचेसह प्रहार पक्षाचे पदाधिकारी तथा न.प.चे माजी बांधकाम सभापती बल्लू जवंजाळ, उपजिल्हा प्रमुख प्रशांत आवारे आदी उपस्थित होते.