शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलाचा परिणाम, रबीच्या पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: December 6, 2015 00:08 IST

खरीपाचा हंगाम अपुऱ्या पावसाअभावी उध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा रबीवर होती.

नवे संकट : आठवड्यात पेरणी क्षेत्रात १२ टक्केच वाढ अमरावती : खरीपाचा हंगाम अपुऱ्या पावसाअभावी उध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा रबीवर होती. परंतु ऐन पेरणीच्या हंगामात महिन्याभऱ्यापासून सतत वातावरण बदलत आहे. थंडीच्या दिवसात उष्णतामान वाढल्याने रबीच्या पेरण्या खोळंबल्या आहे. शेतकऱ्यांच्या मागे पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे. यंदाच्या खरीपाचा हंगामात दीड महिना उशीरा पाऊस व नंतर पावसात खंड यामुळे खरीपाचा हंगाम महिन्याभऱ्याने माघारला. त्यामुळे रबीचा हंगाम देखील माघारला. त्यात पावसाच्या दिवसात सरासरीपेक्षा कमी पावसाने जमीनीत आर्द्रता नाही, तसेच कपाशीवर ‘लाल्यांचा’ प्रादुर्भाव यामुळे कपाशीचे उत्पन्नात कमी झाली. महिन्याभऱ्यापासून वातावरणात सतत बदल होत असल्याने तुर पिकांवर देखील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तापमानात वाढ झाल्याने पेरणी झालेल्या हरभऱ्याची वाढ खुंटली आहे. व ‘भर’ रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. डिसेंबर महिन्यातही थंडी नसल्याने गव्हाची पेरणी खोळंबली आहे. थंडीच्या अभावाचा परिणाम हरभऱ्याप्रमाणेच तुर पिकावर देखील मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यंदाच्या रबी हंगामासाठी कृषि विभागाने १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. यापैकी ९७ हजार ९२४ हेक्टर क्षेत्रात सद्यास्थितीत पेरणी झालेली आहे. पेरणीची ही ६६ टक्केवारी आहे. मागील आठवड्यात पेरणीची ५५ टक्केवारी होती म्हणजेच एका आठवड्यात रबीच्या पेरणीत फक्त ११ टक्कयांनी वाढ झाली आहे. हे १५ हजार ७९६ हेक्टर क्षेत्र आहे. गव्हाची पेरणी रखडलीगव्हाच्या उगवणशक्तीसाठी व वाढीसाठी वातावरणात थंडी आवश्यक आहे. मात्र महिन्याभऱ्यापासून थंडीचा अभाव असल्याने अद्याप प्रस्तावित क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रातील गव्हाच्या पेरण्या रखडल्या आहेत. तसेच विहिरींची कमी होत असलेली पातळी व दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे ओंबीवर असणाऱ्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.याचाही काही प्रमाणात परिणाम होऊन गव्हाचे क्षेत्र कामी होत आहे.