शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्जीवन शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:20 IST

शहरात महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून एकाच वेळी ५० जणांनी अवयवदानाचा संकल्प करून ऐतिहासिक घटनेची नोंद केली आहे. येथील पुनर्जीवन फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय आहे. अवयवदात्यांची संख्या पाहता येथे अवयवदान शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करावे, .....

ठळक मुद्देशंकरबाबा पापळकर : जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांसह ५० जणांचा अवयवदानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरात महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून एकाच वेळी ५० जणांनी अवयवदानाचा संकल्प करून ऐतिहासिक घटनेची नोंद केली आहे. येथील पुनर्जीवन फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय आहे. अवयवदात्यांची संख्या पाहता येथे अवयवदान शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करावे, अशी मागणी अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांनी केली. पुनर्जीवन फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सामूहिक अवयवदान संकल्प कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जाकीर, सुरेश ठाकरे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश उभाड, गांधारी पापळकर, संध्या वैद्य, शोभा मुघलसह डॉ. संदीप चौधरी, जितेंद्र रोडे, श्रीराम कुलकर्णी, राजा पिंजरकर, विनोद नागे, प्रमोद डेरे, सुदर्शन काळे आदी उपस्थित होते.माझ्या १२३ गतिमंद अंध अपंग मुलांच्या वेदना मला माहीत आहेत. आपण जिजाऊ बिग्रेडच्या महिलांनी अवयवदानाचा घेतलेला संकल्प देशाला प्रेरणादायी आणि मृत्यूनंतरही इतरांना जीवन देणारा आहे, असे शंकरबाबा पापळकर पुढे म्हणाले. अवयवदानाचे महत्त्व समजावून घेत आपण केलेला संकल्प खरोखरच महान आहे. परतवाडा येथे अवयवदान केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना अवयवदानाचे महत्त्व मान्यवरांनी विशद केले.संभाजी ब्रिगेडच्या महिलांनी अवयवदानाचा संकल्प करीत समाजापुढे एक आदर्श ठेवला. यामध्ये उज्ज्वला प्रवीण बेलसरे, वृषाली प्रवीण भिंगारे, अलका राजेंद्र बोंडे, सुवर्णा सचिन चतुर, कल्पना प्रभाकर चौधरी, मीनाक्षी विनोद दळवी, नर्मदा जानराव दळवी, रेणुका शरद दसरे, सरिता महेश गाडगे, प्रिया सचिन गवई, हर्षदा राजेश इंगळे, कल्पना लक्ष्मण इंगळे, अंजली अशोक जवंजाळ, मंदा दादाराव जवंजाळ, मनीषा राहुल कडू, सुशीला अंबादास कडू, रूपाली दिनेश कळसकर, स्वाती शैलेश कांडलकर, स्वप्ना प्रवीण खेरडे, मोनाली नितीन मानकर, लक्ष्मी जगदीश पानसे, वैशाली राजेश पातोंड, लीनता अजय पवार, विजया राजेश फाटकर, भारती अमोल राऊत, अपर्णा जितेंद्र रोडे, किरण वडुरकर, संध्या बाबासाहेब वैद्य, दीपाली मनीष विधळे, सचिन चतुर, भगवंत गावंडे, अशोक जवंजाळ, दिनेश कळसकर, प्रवीण काळे, जगदीश पानसे, गौरव पारवे, अजय पवार, अमोल राऊत, नीलेश मनीष विधळे, गौरव राठी आदींचा समावेश आहे. या सोहळ्याला नागरिकांची भरगच्च उपस्थिती होती.परतवाड्यात पुनर्जीवन फाउंडेशनच्या मदतीने एकाच दिवशी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांसह तब्बल ५० जणांनी अवयवदानाचा संकल्प करणे ऐतिहासिक आहे. फाऊंडेशनचे कार्य अविरत सुरू राहील.- डॉ राजेश उभाड,अध्यक्ष पुनर्जीवन फाउंडेशन