शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आज महापालिकेची आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 00:22 IST

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार ७ आॅक्टोबरला सकाळी स्थानिक टाऊन हॉलमध्ये आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

शिक्कामोर्तब : राजकारण्यांची मांदियाळीअमरावती : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार ७ आॅक्टोबरला सकाळी स्थानिक टाऊन हॉलमध्ये आरक्षण सोडत काढली जाणार आहे. याचवेळी प्रभागरचनाही जाहीर होईल. समस्त राजकारण्यांचे या सोडतीकडे लक्ष लागले असून उत्कंठता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवार ७ आॅक्टोबरला महापालिका निवडणुकींच्या अनुषंगाने नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग निश्चित करण्यात येईल. ४३ प्रभागांचे २२ प्रभागांमध्ये झालेले रुपांतर सार्वजनिक होईल. कुठल्या प्रभागाला कोणता भाग जोडला, कोणता तोडला, हे चित्र स्पष्ट होणार असल्याने नेहरू मैदानात राजकारण्यांची गर्दी राहणार आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत एकूण ८७ पैकी १५ जागा अनुसूचित जातींसाठी, २ जागा अनुसूचित जमातींसाठी, तर २३ जागा इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित असेल. ४७ जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. २२ प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार असून याविषयीची आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात येऊन शालेय मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण निश्चित केले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने सर्वसाधारण आणि आरक्षित जागांमध्येही ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. निवडणूक आयोगानुसार प्रभागरचनेचा पारुप नकाशा १० आॅक्टोबरला प्रसिद्ध होईल. मात्र सोडतीच्या दिवशी आरक्षणाची माहिती समजावी, यासाठी शुक्रवारी नकाशे लावले जातील. २२ प्रभागांचा नकाशा टाऊन हॉलमध्ये लावला जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारीच प्रभाग रचनेचा सस्पेन्स संपुष्टात येईल., आरक्षणासोबतच बहुप्रतीक्षित प्रभाग रचनेचा ‘मॅप’ इच्छुकांची मांदियाळी खेचण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. (प्रतिनिधी)प्रभाग रचनेचा प्रस्थापितांना फटका? महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेली प्रभाग रचना एकाही प्रस्थापित नेत्यांसाठी सोईची नसल्याचे बोलले जात आहे. प्रत्येकजण आपआपल्या सोईचा अंदाज वर्तवत आहेत. पहिल्या १० प्रभागाची रचना एकाही मावळत्या नगरसेवकाला सोपी नसल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी या चर्चेला पूर्णविराम मिळणार असून ‘वास्तव’ चित्र स्पष्ट होणार आहे. झाडून साऱ्या राजकारण्यांची प्रभागरचनेबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.