शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा फटका, इच्छूक हिरमुसले, पर्यायी गटांची चाचपणी

By admin | Updated: October 6, 2016 00:28 IST

राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेल्या जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्र्श्वभूमीवर बुधवारी काढण्यात आलेल्या आरक्षणाचा फटका अनेक प्रस्थापितांना बसला आहे.

हादरा : काहींना नव्या घरोब्याचा शोध तर काहींना मिळणार राजकीय विश्रांतीअमरावती : राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेल्या जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्र्श्वभूमीवर बुधवारी काढण्यात आलेल्या आरक्षणाचा फटका अनेक प्रस्थापितांना बसला आहे. निवडणूक लढविण्यासाठी काहींना गट (सर्कल) नसल्यामुळे त्यांना राजकीय दृष्ट्या विश्रांती घेण्याचा प्रसंग ओढावला आहे. तर काहींना नव्या घरोब्यासाठी चाचपणी करावी लागणार आहे.जिल्हा परिषद सर्वसाधारण निवडणूक होणार असल्याच्या धर्तीवर आरक्षण काढल्या जाणार असल्या बाबतची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. नेमके आरक्षणात काय होणार, याकडे वेध लागले असताना बुधवारी गटाच्या आरक्षणानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बुधवारच्या आरक्षण सोडतीनंतर सोडतीनंतर ईच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या गटाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विद्यमान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर या पदाधिकांऱ्यासह कॉग्रेसचे गटनेता तथा माजी अध्यक्ष बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, सुधीर सुर्यवंशी, प्रताप अभ्यंकर, मोहन सिंगवी, मोहन पाटील, उमेश केने, ज्योती आरेकर, प्रवीण घुईखेडकर, ममता भांबुरकर, महेंद्रसिंग गैलवार, सदाशिव खडके, श्रीपाल पाल, विक्रम ठाकरे, मंदा गवई, विनोद डांगे आदींना आरक्षणाचा फटका बसला आहे. नव्या आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’ हे चित्र अनुभवता आले. विशेष म्हणजे आगामी जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गटाची फेररचना करण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्या प्राधान्य क्रमानुसार अनेक गटांमध्ये काहे गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये अंजनगाव सुर्जी व भातकुली या दोन तालुक्यातील प्रत्येकी एक या प्रमाणे दोन गट कमी झाले आहेत. तर अमरावती आणि धारणी या दोन तालुक्यात दोन गट नव्याने वाढले आहेत. या बदल्याचा फटका पदाधिकाऱ्यांना बसला आहे. तर अनेक ईच्छुकांना या आरक्षण बदल्याने संधी चालून आली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. (प्रतिनिधी)विद्यमान सदस्य घेणार नव्या घराचा शोधआरक्षण सोडतीमध्ये बबलू देशमुख यांचा कुऱ्हा मतदार संघ राखीव झाल्याने ते चांदुरबाजार मधील घाटलाडकी सर्कल मधून लढण्याची शक्यता आहे. रवींद्र मुंदे याचा वाढोणा रामनाथ गट राखीव झाल्याने त्यांनी नांदगाव मधील लोणी टाकळी गटातून निवडणूक लढण्याची तयारी केल्याची माहिती आहे. सुरेखा ठाकरे यांचा आसेगाव मतदार संघ राखीव असल्यामुळे त्या कांडली गटातून निवडणूृक लढण्याची शक्यता आहे. प्रताप अभ्यकंर हे धामणगाव गढी येथून नशीब अजमावण्याची शक्यता आहे. तसेच सुधीर सुर्यवंशी, महेंद्रसिंग गैलवार, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, मंदा गवई, सदाशिव खडके आदी काही विद्यमान पदाधिकारी व सदस्य नव्या घरोब्याच्या शोधात आहेत. तर काहीनी कुटूंबातील महिलांना रिंगणात लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे खरे चित्र हे निवडणूक कार्यक्रमानंतरच स्पष्ट होणार आहे.