शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जयश्री मोरय्यांचे पीठासीन सभापतींवर शरसंधान

By admin | Updated: October 21, 2016 00:19 IST

शहर अभियंत्यांबाबतच्या एका प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आग्रही असलेल्या जयश्री मोरय्या यांनी थेट पीठासीन सभापतींवर...

नगरसेवकांची मध्यस्थी : प्र्रश्नोत्तराचा तास रंगलाअमरावती : शहर अभियंत्यांबाबतच्या एका प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आग्रही असलेल्या जयश्री मोरय्या यांनी थेट पीठासीन सभापतींवर शरसंधान केल्याने आमसभेत एकच हलकल्लोळ माजला. महापौरांविरोधात त्या अत्यंत आक्रमक झाल्याने काही नगरसेवकांना मध्यस्थी करावी लागली.गुरुवारी सकाळी ११ वाजता आमसभेला सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका व जयश्री मोरय्या यांनी आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नसल्याचे सांगत सभागृह डोक्यावर घेतले. अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांच्या नियुक्तीबाबत मोरय्या यांनी २९३ व २९४ असे दोन प्रश्न आमसभेत उपस्थित केले होते. मात्र सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या दोन्ही प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यावेळी आपण कुठल्या प्रश्नावर बोलताय, अशी विचारणा महापौरांनी केली. त्यावर आपण विषय पत्रिकेचा अभ्यास केला नाही का, असा उलट सवाल मोरय्या यांनी उपस्थित केला. त्यावर महापौर भडकल्या. मी अभ्यास केलाय, असे सांगत आपण सभागृहाची मर्यादा पाळा, मुझे हाउस चलाना है, असे सांगत महापौरांनी त्यांच्या प्रश्नाचे काय झाले़ याचे उत्तर देण्याचे प्रशासनाला सांगितले. तुमचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात येईलच, तेव्हा त्यावर बोला. असेही महापौरांनी बजावले. त्यानंतरही महापौर म्हणजे वन मॅन शो नसल्याचा आक्रस्ताळेपणा करण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाने उत्तर दिल्यानंतरही मोरय्या ऐकायला तयार नव्हत्या. त्यांना पिठासिन सभापतींनी बसण्यास सांगितले. तुम्ही बसा अन्यथा तुम्हाला बाहेर काढावे लागेल, असा दम देण्यात आला. शेवटी महापौरांच्या समर्थनार्थ अनेक नगरसेवक सरसावले. मागील आमसभेत सभागृहाने तुमची हतबलता अनुभवली, असा थेट हल्ला महापौरांवर करण्यात आला. सुजाता झाडे यांच्यासह जयश्री मोरे ,निलिमा काळे यांनी मोरय्या यांना समजावण्याचा प्रयत्न केला. या खडाजंगीतच मोरय्या यांचे दोन्ही प्रश्न पुढील आमसभेत प्राधान्याने घ्यावीत, असे निर्देश पीठासीन सभापतींनी दिले. शेवटी या गदारोळातच प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली. (प्रतिनिधी)