शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारप्राप्त खेळाडूंची वणवण

By admin | Updated: December 2, 2015 00:09 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासोबतच क्रीडा विभागाने शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडुंची उपेक्षा चालविल्याचा प्रकार उघड झाला.

ऐनवेळी मिळाले कापड : जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची लेटलतिफी, ३ ला पुरस्कार वितरणअमरावती : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासोबतच क्रीडा विभागाने शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडुंची उपेक्षा चालविल्याचा प्रकार उघड झाला. पुरस्कार वितरण सोहळा तोंडावर येऊन ठेपला असताना महत्प्रयासाने हा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडुंना वेळेपर्यंत ‘ब्लेझर’ देखील मिळाले नव्हते. ३ डिसेंबरला बालेवाडी, पुणे येथे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडुंचा गौरव होणार आहे. तथापि अमरावतीमधील ज्या महिला खेळाडुंचा तेथे सन्मान होणार आहे त्या समारोहात सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेले ‘ब्लेझर’चे कापड ऐनवेळी मिळाले. ‘मोनो’ तर अद्यापही न मिळाल्याने ही महिला खेळाडू खिन्न आहे. यवतमाळातील पुरस्कारप्राप्त पुरूष खेळाडूला तर अद्यापही ब्लेझरचे कापड मिळालेले नाही. त्यामुळे या दोन्ही गुणवान खेळाडुंच्या पुण्यातील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. ३ डिसेंबरला होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात सहभागी होण्यासाठी या दोन्ही खेळाडुंना बुधवारीच अमरावती सोडावे लागणार आहे. विशेष म्हणजे अमरावतीच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त महिला खेळाडूला मंगळवारी अगदी वेळेवर निमंत्रण पत्रिका देण्यात आली. यावरून खेळाडूंबद्दलची जिल्हा क्रीडा कार्यालयाची अनास्था उघड झाली आहे. सन २०१३-१४ मधील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविणाऱ्या राज्यातील खेळाडुंना ३ डिसेंबरला पुरस्कार वितरित केले जातील. अमरावतीची आट्यापाट्या खेळाडू वृषाली गुल्हाने आणि यवतमाळचा आकाश नांदुरकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या समारंभात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या पोषाखात म्हणजे ‘ब्लेझर’ परिधान करून उपस्थित राहणे बंधनकारक आहे. या खेळाडूंना ब्लेझरवर लावण्यासाठी ‘मोनो’ सुध्दा पुरविण्यात येतो. गुणवान खेळाडू उपस्थितांच्या ठळकपणे नजरेत भरावेत, यासाठी शासन ही सोय करते. मात्र, स्थानिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला मात्र याचे अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसून आले. पुरस्कार वितरण समारोह अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असताना अमरावतीच्या वृषाली गुल्हाने हिला सोमवारी रात्री जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ‘ब्लेझर’चे कापड पुरविण्यात आले. त्यामुळे मंगळवारी एका दिवसात ‘ब्लेझर’ शिवून घेण्याची कसरत वृषालीला करावी लागली.