चांदूर रेल्वे : येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्याचे मानधन दोन वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे. मात्र, या बाबीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
स्थानिक बीएसएनएल कार्यालयात बरेच कर्मचारी रोजंदारीवर आहे. ते सतत दोन वर्षांपासून आपले काम करीत आहे. परंतु त्यांना मानधन किंवा महिन्याचा पगार मिळ्लेला नाही. परंतु याकडे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पगाराविना कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला आहे. त्यामुळे लवकात लवकर त्यांचे मानधन द्यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. सदरहू कर्मचारी पगारावर नसुन कमिशन बेसीसवर ठेवण्यात आलेले आहे. त्यांना जर कमिशन मिळत नसेल तर त्याची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात येईल, असे बीएसएनएलचे जनरल मॅनेजर सुनील अग्रवाल यांनी सांगितले.