शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटानंतर वीस वर्षांनंतर पतीशी पुनर्विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST

वारंवार उडत होते खटके, पतीने दिले मद्यपान सोडण्याचे वचन वनोजा बाग : पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यानंतर वीस वर्षानंतर त्यांचा पुनर्विवाह ...

वारंवार उडत होते खटके, पतीने दिले मद्यपान सोडण्याचे वचन

वनोजा बाग : पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यानंतर वीस वर्षानंतर त्यांचा पुनर्विवाह थाटात पार पडला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा गावात शनिवारी सायंकाळी पार पडलेला हा विवाह सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुऱ्हा येथील श्यामराव मोरे यांची मुलगी सुगंधा यांचा विवाह २० वर्षांपूर्वी लाखपुरी (ता. मुर्तीजापुर) येथील संतोष जामनिक (४७) यांच्याशी झाला होता. सात वर्षे संसार सुरळीत चालला. यानंतर संतोषला दारूचे व्यसन जडल्याने दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. त्यामुळे सुगंधा पतीला सोडून माहेरी आली. तेथून दोन वर्षांनंतर सुगंधाचे दुसरीकडे लग्न झाले. पण, दुसरा पतीदेखील दारूडा होता. नशेत मारहाण करत असल्याने सुगंधा परत माहेरी निघून आली. त्यानंतर आई-वडिलांच्या घरी राहून शेतीची कामे ती करू लागली. सुगंधाला अपत्य नाही, तर दुसरीकडे सुगंधाचा पहिला पती संतोष जामनिक हा वीस वर्षांपासून पत्नीविना होता.

वीस वर्षांनंतर संतोष हा सुगंधाच्या आई-वडिलांच्या भेटीसाठी आला. त्याने सुगंधासोबत पुनर्विवाह करण्याची इच्छा तिच्या आई-वडिलांकडे बोलून दाखविली. आता मद्यपान करणार नाही, असे त्यांना वचन दिले. त्यामुळे सुगंधासह तिच्या आईवडिलांनी या पुनर्विवाहाला होकार दिला. पुनर्विवाह शनिवारी सायंकाळी मुऱ्हा येथील बुद्धविहारात पार पडला. बौद्ध परंपरेनुसार भिक्खूंच्या हस्ते हा पुनर्विवाह पार पडला. यावेळी आशीर्वाद देण्यासाठी गावातील नागरिक व नातेवाईक उपस्थित होते.