शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरचा काळाबाजार, आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:13 IST

अमरावती : बनावट ग्राहक पाठवून अमरावती शहरातील रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या प्रकरणी बुधवारी रात्री ...

अमरावती : बनावट ग्राहक पाठवून अमरावती शहरातील रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा पीडीएमसीमध्ये काम करणाऱ्या एका कंत्राटी वाॅर्डबॉयला पोलिसँनी अटक करून त्याच्या ताब्यातून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केली. आता आरोपीची संख्या सात झाली असून, या प्रकरणी दोन कंत्राटी वाॅर्डबायची हकालपट्टी केली. खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत एका लॅब टेक्निशियन व दोन डॉक्टरांवर कारवाईसाठी प्रस्ताव तातडीने पाठविला. यामध्ये तिवसा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या एका डॉक्टराचा तसेच ‘एनआरएचएम’मध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांचा समावेश आहे. हा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोग्य उपसंचालकाकडे पाठविला आहे.

शहर गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार विनीत अनिल फुटाणे (वय २१, रा. खराळा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पीडीएमसी रुग्णालयात कंत्राटी वाॅर्डबॉय होता. त्याला बुधवारी (दि. १२) रात्री पीडीएमसीमधून अटक केल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी दिली. आरोपींकडून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी १५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला; तर बुधवारी दोन रेमडेसिविर जप्त केले.

बॉक्स

दोन कंत्राटी अटेंडंटची हकालपट्टी

रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपी तीन कंत्राटी अटेंडंटची हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये सुपर स्पेशालिटी कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत अटेंडंट आरोपी शुभम कुमोद सोनटक्के (२४, रा. चपराशीपुरा) याला कोविड हॉस्पिटलने कार्यमुक्त केल्याची माहिती सीएस श्याम सुंदर निकम यांनी सांगितले. महावीर हॉस्पिटलमध्ये अटेंडंट असलेला शुभम शंकर किल्हेकर (वय २४, रा. वडाळी) याल हॉस्पिटलने तातडीने काढून टाकले.

बॉक्स

दोन डॉक्टरांचा कारवाईसाठी प्रस्ताव

काळाबाजार करताना आढळून आलेला तिवसा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक असलेला तथा डॉ. पवन दत्तात्रय मालुसरे (३५, रा. कॅम्प रोड फ्रेजरपुरा) याच्या चारचाकी वाहनातून पाच रेमडेसिविर जप्त करण्यात आले होते. त्याचे नाव समोर येताच सीएस श्यामसुंदर निकम यांनी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठविल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच भातकुली येथे एनआरएचएम अंतर्गत काम करणारा डॉ. अक्षय राठोड व एचआयव्ही कार्यक्रमात कंत्राटी टेक्निशियन असलेला संजीवनी हेल्थ केअर सेंटरला कार्यरत टेक्निशियन अनिल पिंजरकर याचाही कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला.

बॉक्स

पॉझिटिव्ह रुग्णाला ठेवले तात्पुरत्या कारागृहात

कोविड पॉझिटिव्ह आरोपीकरिता तात्पुरते कारागृहाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांना ठेवून त्यांच्यावर कोविडचा उपचार केला जातो. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना या कारागृहात ठेवण्यात आले आहे. १५ दिवसांनंतर त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात येईल, अशी मागणी गुन्हे शाखेने दिली.

बॉक्स :

तो करीत होता आयसीयूमध्ये काम

पीडीएमसी हॉस्पिटलमध्ये कंत्राटी अटेंडंट विनीत अनिल फुटाणे (२१, रा. खराळा) याला पोलिसांनी अटक केली. तो पीडीएमसीतील मेडिसिन आयसीयूमध्ये अटेंडंटमधून काम करीत होता, त्याची नेमणूक एका एजन्सीमार्फत करण्यात आली होती; तसेच तो एका खासगी कोविड रुग्णालयातही काम करीत होता. त्याची माहिती घेऊन त्याला काढून टाकण्यासंदर्भाचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात येईल, असे डीन अनिल देशमुख यांनी सांगितले.