शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हा येथे नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांकडून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:15 IST

तात्काळ भरपाई मिळवून द्या, यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला आदेश अमरावती-तिवसा : जिल्ह्यातील तिवसा परिसरातील वऱ्हा गावात वादळामुळे अनेक घरांचे ...

तात्काळ भरपाई मिळवून द्या, यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला आदेश

अमरावती-तिवसा : जिल्ह्यातील तिवसा परिसरातील वऱ्हा गावात वादळामुळे अनेक घरांचे नुकसान आणि पडझड झाली. या नुकसानाची पाहणी महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधून दिलासा दिला.

वऱ्हा येथे घरांचे वादळामुळे नुकसान झाले. त्याची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी याठिकाणी सोमवारी भेट देऊन नुकसानग्रस्तांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना अन्नधान्याचे वाटपदेखील केले.

वऱ्हा येथील नुकसानाची पाहणी करून पंचनामे व सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तत्काळ करून संबंधितांना सानुग्रह अनुदान लवकरात लवकर मिळेल, यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करण्यात येईल. प्रशासनाने तात्काळ आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी दिले. वऱ्हा येथे ५० हून अधिक घरांचे नुकसान वादळामुळे झाल्याची माहिती तहसीलदार योगेश फरताडे यांनी दिली.