शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकाऱ्यांविना नगरपंचायतींचा कारभार

By admin | Updated: December 2, 2015 00:07 IST

जिल्ह्यात नवनिर्मित चार नगरपंचायतींची प्रशासकीय राजवट सोमवारी ३० नोव्हेंबरला संपुष्टात आली.

जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष : सोमवारी संपली, प्रशासकीय राजवटअमरावती : जिल्ह्यात नवनिर्मित चार नगरपंचायतींची प्रशासकीय राजवट सोमवारी ३० नोव्हेंबरला संपुष्टात आली. मात्र, जिल्हा प्रशासनाने या नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती केली नाही किंवा अन्य अधिकाऱ्यांना प्रभारही दिलेला नसल्याने नगरपंचायतींचा पहिला दिवस मुख्याधिकाऱ्यांना विनाच पार पडला. जिल्ह्यात तिवसा, भातकुली, धारणी व नांदगाव खंडेश्वर या चार तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायती स्थापन करण्यात आल्यात. एप्रिल महिन्यात या ग्रामपंचायती बरखास्त करून शासनाने संबंधित तहसीलदारांची नगरपंचायतींचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली व प्रशासकीय राजवटीच्या सहा महिन्यांच्या आत सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहे.त्याअनुषंगाने १ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. तसेच ३० नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूकदेखील पार पडली. या निवडणुकीनंतर प्रशासकीय राजवट संपली. तहसीलदार प्रशासकाच्या जबाबदारीतून मुक्त झाले. वास्तविक नगरपंचायतींवर तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे नगरपंचायतींना मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे होते. मात्र, सहा महिने उलटूनही मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. आता तर प्रशासकांचा कार्यकाळ देखील संपुष्टात आला आहे. मात्र, मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती अथवा अन्य अधिकाऱ्यांकडे प्रभार न दिल्यामुळे नगरपंचायतींचा प्रशासकीय कारभार ठप्प पडला आहे. यासंदर्भात नगर प्रशासन विभागाच्या जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते नागपूरला गेल्याचे सांगण्यात आले.