शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जातून साडेतीन टक्के कपात

By admin | Updated: June 14, 2015 00:15 IST

मागील ३ वर्षांपासून राज्यात दुष्काळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत.

शेतकऱ्यांची लूट : शासनाच्या आदेशाला तिलांजलीप्रभाकर भगोले चांदूररेल्वेमागील ३ वर्षांपासून राज्यात दुष्काळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मात्र, अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही. त्यात भर म्हणून नवीन कर्ज देताना प्रोसेसिंग चार्ज लावून शेतकऱ्यांच्या हातात मिळालेल्या तुटपुंज्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेने सुरू केला आहे. कर्जातून तब्बल साडेतीन टक्के कपात करण्याचा हा प्रकार तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात सुरू असून यामुळे शेतकरी संतप्त आहेत. चारही बाजूने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीककर्जातूनही साडेतीन टक्क्यांची कपात होत असल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. इतर खासगी कंपन्याप्रमाणे महाराष्ट्र बँकेनेही पीक कर्जातून प्रोसेसिंग चार्ज कापण्याचा प्रकार सुरू केला आहे. कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे शेतकऱ्याने गोळा केलेली असतात. साधी रेव्हेन्यू तिकिटही बँक लावत नाही. मग प्रोसेसिंग चार्ज कशाचा? असे बँक व्यवस्थापक भगत यांना विचारले असता त्यांनी संबंधित प्रतिनिधीला टोलवाटोलवीची उत्तरे दिली. तालुक्यातील इतर बँकांकडून अशी कुठलीही कपात केली जात नसल्याची चर्चा असल्याने बँक आॅफ महाराष्ट्रला ही कपात करण्याचे अधिकार कोणी दिले, असा संतप्त सवाल परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. हा प्रकार शेतकऱ्यांची लूट करणारा असल्याने तालुक्यातील सामाजिक संस्था व संघटनांनी या प्रकाराविरूध्द दंड थोपटले असून बँकेच्या या कारवाईचा जाब विचारण्याचा पवित्रा घेतला आहे. मुख्य अधिकाऱ्यांच्या आदेशावरुन आम्ही तीन टक्के प्रोसेसिंग चार्जची कपात करतो. याबाबत सविस्तर माहितीसाठी अमरावतीच्या क्षेत्रीय शाखेशी संपर्क साधू शकता. - प्रकाश भगत,शाखाप्रबंधक, बँक आॅफ महाराष्ट्र, चांदूररेल्वे