शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

रेड्डींनी राष्ट्रीय बांबू अभियान धुळीस मिळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:12 IST

अनिल कडू फोटो पी १० मशिन परतवाडा : महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे सोपविले गेलेल्या ...

अनिल कडू

फोटो पी १० मशिन

परतवाडा : महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे सोपविले गेलेल्या राष्ट्रीय बांबू अभियानास तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांनी धुळीस मिळविले आहे. त्यांनी तीन वर्षांपासून हे राष्ट्रीय बांबू अभियान गुंडाळून ठेवले. या अभियानांतर्गत उभारावयाच्या हायटेक बांबू नर्सरीला त्यांनी तिलांजली दिली आहे.

बांबू प्रक्रिया युनिट अंतर्गत बांबू प्रशिक्षणाकरिता खरेदी केल्या गेलेल्या लाखो रुपयांच्या मशिन्स एका गोडाऊनमध्ये कचऱ्यासमान धूळखात पडल्या आहेत. या नव्या मशिन्स समवेत ज्या मशिन्स प्रादेशिक वनविभागाच्या आहेत, त्याही निर्धारित ठिकाणावरून काढून व्याघ्र प्रकल्पाच्या कस्टडीत घेण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांचेकडून राष्ट्रीय बांबू अभियान अंतर्गत सन २०१८ - १९ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ८३ लाखांचा निधी दिला गेला. यात हायटेक बांबू नर्सरीकरिता ५० लाख, प्रक्रिया युनिटकरिता ३० लाख, शेतकऱ्यांना उपयोगी अशा डेमोस्ट्रेशन प्लॉटकरिता ३ लाख दिले गेले. यातील प्रक्रिया युनिट अंतर्गत ११ लाख ९५ हजार २७१ रुपये बांबू प्रशिक्षण मशिनरी खरेदीवर खर्च झालेत. उर्वरित ७१ लाख ४ हजार ७२९ रुपये मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानात वळते केल्या गेले. हा महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून दिला गेलेला ७१ लाखांचा निधी तीन वर्षांपासून या व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानात पडून आहे.

आंबटकरांकडून लक्षवेध

विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर यांनी सन २०२१ मध्ये विधानपरिषद तारांकित प्रश्न क्रमांक ७,०८० अन्वये यावर लक्ष केंद्रित केले होते. महाराष्ट्र बांबू विकास मंडळातील निधीचा नियमबाह्य वापर झाल्याबाबतचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नांच्या उत्तरादाखल माहितीतून व्याघ्र प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय बांबू अभियान संबंधितांकडून दुर्लक्षित ठेवल्याचे सत्य उघड झाले आहे.