शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वाचा गेली, पाय गेले, हात पडले लुळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST

आले कायमचे दिव्यांगत्व फोटो - राऊत, राऊत १ कायमचे अपंगत्व, दिघी महल्ले येथील तीन मुलांचे आयुष्य अंथरुणावर मोहन ...

आले कायमचे दिव्यांगत्व

फोटो - राऊत, राऊत १

कायमचे अपंगत्व, दिघी महल्ले येथील तीन मुलांचे आयुष्य अंथरुणावर

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे

जन्म झाल्यानंतर त्यांना रडता आले, कुणी पाहिले तर हसता आले, जन्मदात्यांना ओळखता आले, मात्र जेव्हा चालण्यायोग्य झाले तेव्हा अवघ्या दोन वर्षांच्या वयात वाचा गेली. हात उचलणे बंद झाले. कंबरेपासून पाय लुळे पडले. आता तर कायमचे अपंगत्व आले आहे. अंथरुणापुरतेच त्यांचे आयुष्य सीमित झाले आहे. एकाच कुटुंबातील तिघांना हा विचित्र आजार जडला आहे.

धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीकाठावरील अडीच हजार लोकवस्तीच्या दिघी महल्ले या गावी कुंभार बांधवांची आठ ते दहा कुटुंबे राहतात. यातील शेतमजुरी करणारे विठ्ठल वझे यांना दोन मुले. यश नऊ वर्षांचा, तर नीलेश सात वर्षांचा. यशचा जन्म झाल्यानंतर ते हसत-खेळत-रडत असत. त्यांच्या शरीराच्या सर्व हालचाली होत होत्या. मात्र, दोन वर्षांचा होताच अचानकपणे बोलणे बंद झाले. त्याला धडपणे पायावर उभे राहणे जमत नव्हते. लगेच हातही लुळे पडले. काही दिवसांतच खुर्चीवर बसायला शक्य झाले नाही. अखेर यशला बिछान्याचा आधार घ्यावा लागला. प्रसूतिकाळातील चूक असेल, या भावनेतून दुसऱ्यांदा योग्य काळजी घेण्यात आली. मात्र, नीलेशचेदेखील दोन वर्षांचा होताच यशप्रमाणे बोलणे, चालणे, बसणे बंद झाले.

------------------

चुलतभाऊही झाला बहुविकलांग

विठ्ठल वझे यांचा चुलतभाऊ अमोल वझे यांचा मुलगा आदित्यची स्थिती यश आणि नीलेशसारखी झाली आहे. वझे कुटूंबातील तिन्ही मुले आज बिछान्यावर आहेत.

------------------

पोटाची खळगी भरायची कशी? पालकांचा प्रश्न

विठ्ठल वझे व अमोल वझे आणि त्यांच्या पत्नींना शेतमजुरीवर गुजराण करावी लागते. दुसरीकडे मुलांचे विधी, ब्रशपासून निजेपर्यंत कुणीतरी जवळ असावेच लागते. आतापर्यंत त्यांनी अनेक दवाखाने केले. मात्र आजार कोणता, हे लक्षात आले नाही. उपचार करताना आता हात जमिनीला टेकले आहेत. त्यातच उपचारासाठी पैसा उभा करायचा की पोटाची खळगी भरायची, हा प्रश्नही निर्माण झाला आहे.

सामाजिक व शैक्षणिक प्रगती अशक्य

यश विठ्ठल वझे आज तिसऱ्या वर्गात आहे. त्याला विशेष शिक्षक वैभव गवते घरी येऊन शिकवत आहेत. यश पूर्णतः मतिमंद असल्याने मूलभूत गरजा, स्वतःचे काम स्वतः करणे अशा सामाजिक तसेच गोल काढणे, अक्षराची ओळख आदी शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न शक्य झाले नसल्याचे गवते यांनी सांगितले.

---------------------

प्रसूतीदरम्यान निष्काळजीपणा झाला, तर अपत्य मतिमंद जन्माला येऊ शकते. असे आजार आनुवंशिकतेमधून उद्भवतात. बहुविकलांगत्वावर एखादेच वेळी उपचार शक्य होतो.

- डॉ. ऋषीकेश घाटोळ, बालविकास तज्ज्ञ, अमरावती