शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव यंदा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:47 IST

Tukdoji Maharaj, Amravati News राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरीत्या साजरा न करण्याचा निर्णय अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे५१ वर्षांनंतर प्रथमच सामुदायिक श्रद्धांजली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरीत्या साजरा न करण्याचा निर्णय अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने घेण्यात आला आहे. हा निर्णय पत्रकार परिषदेत सोमवारी जाहीर करण्यात आला. तब्बल ५१ वर्षांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सार्वजनिक पुण्यतिथी महोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो. लाखोंच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्याची परंपरा यंदा खंडित होणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव अर्थात सर्वसंत स्मृति मानवता दिन ३० आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे प्रस्तावित होता. परंतु, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व धार्मिक महोत्सव व धार्मिक स्थळांवरील बंदी लक्षात घेऊन गुरुदेवभक्तांनी त्यांच्या गावातच कोविड नियमाचे पालन करून ५ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी गुरुमाउलींना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाने गुरुदेवभक्तांना केले आहे.

गुरुकुंजात ५० जणांची उपस्थितीराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी स्थळावर प्रशासनाने आखून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून ५० लोकांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्साचा विधिवत प्रारंभ ३० आॅक्टोबर रोजी ब्रम्हमुहूर्तावर करण्यात येईल. याच ठिकाणी ५ नोव्हेंबरला दुपारी ४.५८ मिनिटांनी ५० लोकांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल व त्याचे आॅनलाईन प्रसारण करण्यात येईल, असे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे गुरुकुंज आश्रम येथील केंद्रीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी सांगितले. ३० तारखेला तीर्थस्थापनेच्या कार्यक्रमानंतर सात दिवस समाजप्रबोधनाचे कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम यंदा राहणार नाही.पत्रकार परिषदेला उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, दामोदर पाटील प्रचारप्रमुख, अध्यात्म विभागाचे प्रमुख राजाराम बोधे, चंद्रपूर जिल्हा सेवाधिकारी रुपलाल कावळे, चंद्रलाल शर्मा, शरद कांडलकर आदि उपस्थित होते.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज