शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:15 IST

उन्हाळा लागला अन् तापमानात वाढ झाली की, खाजेच्या (गजकर्ण) आजारातही वाढ होते. १०० नागरिकांमागे ४० ते ५० जणांना या फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य) ला सामोरे जावे लागते. अनुभवी त्वचारोगतज्ज्ञांकडून उपचार न केल्यास गजकर्ण पसरण्याची शक्यता असते. या आजाराने नागरिक बेजार झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशंभर पैकी ५० रुग्णांना खाज : वेळीच उपाय करा; तज्ज्ञ डॉक्टरांचे मत

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाळा लागला अन् तापमानात वाढ झाली की, खाजेच्या (गजकर्ण) आजारातही वाढ होते. १०० नागरिकांमागे ४० ते ५० जणांना या फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य) ला सामोरे जावे लागते. अनुभवी त्वचारोगतज्ज्ञांकडून उपचार न केल्यास गजकर्ण पसरण्याची शक्यता असते. या आजाराने नागरिक बेजार झाल्याचे दिसून येत आहे.नागरिकांना सर्वाधिक जांघेत खाजेचा त्रास असतो. यावर त्वरित उपचार न केल्यास हा आजार वाढत जातो. त्वचेवर लाल चट्टे पडतात तसेच हातांच्या बोटावरही काळपटपणा येतो त्या ठिकाणी असा त्वचारोग झाल्यास अनेकदा स्टेरॉइडमिश्रित क्रीमचा वापर नागरिकांकडून प्राथमिक उपचाराच्या स्वरूपात केला जातो. तो टाळायलाच हवा, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे ठाम मत आहे.त्वचारोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये ४० ते ५० टक्के रुग्ण ही खाजेच्या आजाराने बाधित असतात. ेत्यातील ९० टक्क््यांपेक्षा जास्त रुग्णांनी मित्रमंडळी, नातेवाइकांच्या सांगण्यावरून तसेच खासगी मेडिकल स्टोअर्सच्या संचालकांच्या सल्ल्याने स्टेरॉइडमिश्रित क्रीमचा वापर केलेला असतो व तो घातक ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.खाजेची लक्षणंखाज हा संसर्गजन्य आजार असून, बुरशीचा प्रकार आहे. यामध्ये शरीरावर लालसर खाजविणारे चट्टे येऊन ते गोलसर पसरत जातात. त्याला गजकर्ण (रिंग वर्म) असेही म्हणतात. ते नेहमी घामाच्या जागी येतात. जांघेत, बगलेत, छातीवर आढळून येतात. गजकर्ण शरीरावर डोक्यापासून तर नखापर्यंत कुठेही होऊ शकतो. शरीरावरील भागांवरुन त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधित केले जाते, जसे शरीरावर असल्यास टिनिया कारपोरीस, केसांवर असल्यास टिनिया कॅपिटीस आदी.औषधोपचाराने बरा न होणारा रेसिस्टंट टिनियाआजाराचे औषधोपचार त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्यशिवाय बंद केल्याने तो पुन्हा झपाट्याने वाढतो. असे वाढलेले गजकर्ण जुन्या औषधांनी बरा होईलच असे नाही. बरेचदा त्याचे रूपांतर रेसिस्टंट टिनिया इन्फेक्शनमध्ये होते. या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित त्वचारोगतज्ज्ञांकडून उपचार घ्यावा.कशी थांबवावी खाजेची लागण, प्रसारनियमित आंघोळ करावी. ओले कपडे घालू नये. बाधित व्यक्तीचे कपडे, टॉवेल, चादर, कंगवा वापरू नये, घट्ट कपड्यांचा वापर टाळावा. सुती व सैल कपडे वापरावे. घरामध्ये गजकर्ण असलेल्या व्यक्तींनी एकासोबत उपचार सुरु करावा आदी उपाय या आजाराचा प्रसार थांबवितात.खाजेची कारणेअस्वच्छता, नियमित आंघोळ न करणे, गर्मी व घाम अंगावर काढणे, वाढते वजन, मधुमेह, बाधित व्यक्तीच्या कंगवा, कपडे, चादर आदींचा वापर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय मित्रमंडळी, नातेवाइकांचे ऐकून व मेडिकल स्टोअर्समधून औषध आणून स्वत:वर उपचार ही या आजाराची कारणे असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.स्टेरॉइडमिश्रित क्रीम वापरण्याचे दुष्परिणामपूर्वी आठवड्यातून एका गोळीने कमी होणारे गजकर्ण आता रोजच्या चार गोळ्यांनाही मानत नाही. पूर्वी चार ते सहा आठवड्यामध्ये बरे होणारे त्वचेवरील गजकर्ण आता चार ते सहा महिन्यातही नाहीसे होत नाही. अशा प्रकारच्या स्टेरॉइडमिश्रित क्रीम वापरल्यामुळे गजकर्णच्या कारक फंगसमध्ये प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे आढळले आहे.या आजाराची लक्षणे जेव्हा आढळून येतात तेव्हा त्वचारोग तज्ज्ञांकडून उपचार केला पाहिजे. या आजारात वैयक्तिक स्वच्छता पाळणे अतिशय महत्त्वाचे असते.- डॉ. ज्योत्सना किटुकले (देशमुख)त्वचारोगतज्ज्ञ अमरावती.