शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पत्रकाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा

By admin | Updated: October 31, 2015 01:13 IST

‘लोकमत’च्या नावाचा गैरवापर करून एका वाहतूक व्यावसायिकाला खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास सुरू : ‘लोकमत’च्या नावाचा गैरवापर अमरावती : ‘लोकमत’च्या नावाचा गैरवापर करून एका वाहतूक व्यावसायिकाला खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुचाकी सोडून पळ काढणाऱ्या त्या तोतयाचा शहर कोतवाली पोलिसांनी शोध चालविला आहे. जप्त केलेल्या दुचाकीच्या आधारावर पोलिसांना त्याचा शोध घेणे सोपे झाले आहे. हा प्रकार २९ आॅक्टोबर रोजी रात्री ८ च्या सुमारास जाफरजीन प्लॉटमधील मंगलम ट्रान्सपोर्ट एंजसीमध्ये घडला.गंगाप्रसाद रामआधार निशाद यांच्या मालकीची जाफरजीन प्लॉटमध्ये मंगलम ट्रान्सपोर्ट एजंसी आहे. गुरुवारी रात्री ते कार्यालयात बसले असताना २८ ते ३० वर्षे या वयोगटातील एक इसम तेथे गेला. एमएच ३० एक्यू ७८८ या शाईन वाहनाने तो तेथे पोहोचला होता. निशाद यांच्याशी हस्तांदोलन करून त्याने आपण ‘लोकमत’चा पत्रकार असल्याची बतावणी करून १० हजार रुपये मागितले व धमकीसुध्दा दिली. त्यावर ‘लोकमत’च्या एका कर्मचाऱ्याला मी ओळखत असल्याचे सांगून निशाद यांनी फोन लावला असता त्या तोतयाने गुन्ह्यात अडकू नये, या भीतीपोटी शाईन दुचाकी तेथेच टाकून पळ काढला. याबाबत गंगाप्रसाद निशाद यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. या खंडणीखोर तोतयाविरोधात कायदेशीर तक्रार देण्याची सूचना ‘लोकमत’ कडून निशाद यांना करण्यात आली. दरम्यान शहर कोतवाली पोलिसांनी ती दुचाकी जप्त केली असून त्या तोतया पत्रकाराविरुध्द भादंविच्या कलम ३८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)