शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

राणा लँडमार्कचा घोटाळा ९० कोटींचा!

By admin | Updated: September 3, 2014 23:00 IST

राणा लँडमार्कने स्वत:च वर्षभरात घरे बांधून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २ हजार ४०० गरजूंची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप केला आहे. फसवणूक झालेल्यांच्या तक्रारीवरुन

अमरावती : राणा लँडमार्कने स्वत:च वर्षभरात घरे बांधून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २ हजार ४०० गरजूंची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप केला आहे. फसवणूक झालेल्यांच्या तक्रारीवरुन या जमिनीचे व्यवहार थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले आहे. वर्षभरात फ्लॅट व रो-हाऊसचे स्वप्न दाखवून दोन वर्षांपूर्वी राणा लँडमार्कने गरजूंकडून लाखो रुपये वसूल केले होते. ठरल्यानुसार जमिनीचा विकास व बांधकाम केले नाही. त्यामुळे संबंधितांनी राणा लँडमार्ककडे रक्कम परत मागितली. एक तर घरे द्या नाही तर इसारापोटी दिलेली रक्कम परत करा, अशी ग्राहकांची मागणी होती. याची दखल घेत राणा लँँडमार्कचे संचालक योगेश राणा त्यांच्या सहकार्यांनी हॉटेल मैफिल ईन येथे बैठक घेऊन ग्राहकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रक्कम परत करण्यासाठी राणा यांनी अवधी मागितला होता. अवधी संपूनही फ्लॅट देणे किंवा परत करणे अशी कृती न झाल्यामुळे इसार देणाऱ्यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. याप्रकरणी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी व्यक्तिगत लक्ष घालून फसवणूकदारांना न्याय देण्याची भूमिका घेतली. राणा लँडमार्कसच्या जमीन व्यवहारांना पूर्णत: ब्रेक लावला. जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात १६१ तक्रारी केल्या होत्या. याप्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांच्याकडे दिला होता. त्यांनी विधी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन अधिकाऱ्यांनी तक्रारदारांच्या बाजूने निकाल देण्याचा निर्णय घेतला. याबाबत मध्यंतरी सर्व कायदेशीर बाबी तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत राणा लँडमार्कच्या जमीन व्यवहारावर बंदी घातली आहे. तलाठ्यांना या प्रकरणाची आणि व्यवहारांची विस्तृत माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. या संदर्भात सर्व तलाठ्यांनी दक्षता बाळगण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. तक्रारदारांच्या न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी स्वरुपात काढलेल्या आदेशात हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. (प्रतिनिधी)