शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

दत्तापूर पोलिसांना राखीचे बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:15 IST

भाजपा महिला आघाडीने बांधल्या पोलिसांना राख्या फोटो - दत्तापूर २२ पी धामणगाव रेल्वे : भाजपा शहर महिला आघाडीच्यावतीने ...

भाजपा महिला आघाडीने बांधल्या पोलिसांना राख्या

फोटो - दत्तापूर २२ पी

धामणगाव रेल्वे : भाजपा शहर महिला आघाडीच्यावतीने दत्तापूर पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक पोलिसांनी हजेरी लावत भगिनींच्या रक्षणाचे वचन दिले.

रक्षाबंधन असो, वा अन्य कोणताही सण, पोलिसांना शहरातील शांतता, कायदा सुव्यस्था सांभाळण्यासाठी कामावर हजर राहावे लागते. त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधनासारखा सण साजरा करता येत नाही. त्यामुळे भाजपा शहर महिला आघाडीने यंदाचे रक्षाबंधन पोलिसांसोबत साजरे करण्याचे ठरवले. यावेळी पोलिसांनी आपल्या दैनंदिन कामकाजाबाबत, तसेच शस्त्रे, दारूगोळा याबाबत माहिती दिली. भाजप शहर महिला आघाडी अध्यक्ष नलिनी मेश्राम यांच्या पुढाकाराने हा सण साजरा करता आल्याच्या भावना दत्तापूरचे ठाणेदार राठोड यांनी व्यक्त केली. मानवधिकार आयोगाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सायरे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष उषा तिनखेडे, शहराध्यक्ष नलिनी मेश्राम, नगरसेविका अर्चना गोडबोले, अर्चना ठाकरे, सीमा देवतळे, दर्शना ठाकूर, भाजप महिला आघाडी सरचिटणीस ज्योती पाटील, रीता बोरगावकर आदी यावेळी उपस्थित होत्या.