शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या ‘लकी ड्रॉ’ने उठले आशा-निराशेचे तरंग

By admin | Updated: October 8, 2016 00:15 IST

महापालिका प्रभाग निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत जसजशी जाहीर होऊ लागली आणि हताश झालेले नगरसेवक सभागृहाबाहेर पडू लागले,

इच्छुकांची झोप उडाली : निवडणूक आरक्षण सोडतअमरावती : महापालिका प्रभाग निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत जसजशी जाहीर होऊ लागली आणि हताश झालेले नगरसेवक सभागृहाबाहेर पडू लागले, एरवी अधिकारी आणि अनेकांशी तोऱ्यात बोलणारे इच्छुक पडलेल्या चेहऱ्याने जाताना पाहून कार्यकर्त्यांचाही धीर सुटला. प्रभाग आरक्षण सोडतीने शुक्रवारी देव पाण्यात घालून बसलेल्या इच्छुकांची झोप उडविली तर दुसरीकडे अनपेक्षितपणे लॉटरी लागल्याच्या आनंदात अनेकांना भरते आले. फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या अमरावती महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार ७ आॅक्टोबर रोजी टाऊन हॉलमध्ये सकाळी ११ वाजतापासून सुरू झाली. उत्सुकता शिगेला पोहोचल्याने बहुतांश नगरसेवक सकाळी १० वाजतापासूनच येथे स्थानापन्न झालेत. सोडतीच्या आधीच काहींनी प्रभाग रचना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ११.३० नंतर टाऊन हॉल आणि नेहरू मैदान परिसर नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. महत्त्वपूर्ण सोडतीसाठी जवळपास झाडून साऱ्या नगरसेवकांनी जातीने हजेरी लावली होती. ओळखीचे चेहरे दिसले तरी कसेबसे हसून ते आपली अस्वस्थता लपविण्याचा प्रयत्न करीत होते. पाच वर्षांत नगरसेवकांना एवढे अस्वस्थ पाहण्याची ही पहिली-दुसरीच वेळ होती. महापालिकेवर निवडून जाण्याचा एक पहिला टप्पा म्हणजे प्रभाग आरक्षण सोडत. अर्थात मनासारखे आरक्षण जाहीर झाले की विजय हमखास असेही नाही. पण हव्या त्या प्रभागात हवे ते आरक्षण लागले नाही, तर उगाचच अधिकच्या खटपटी कराव्या लागतील, दुसऱ्या प्रभागात निवडणूक लढवायची म्हटले तर त्याही प्रभागात इच्छुकांची मांदियाळी, त्यामुळे परंपरागत प्रभागातच आरक्षण निघाव्यात, अशी भावना प्रत्येकाची होती. सभागृहात लॉटरीचे काम सुरू असतानाच जाहीर झालेल्या आरक्षणानंतर इच्छुक आणि विद्यमान नगरसेवकांच्या चर्चेचा सूर क्षणात बदलत होता. एकंदरितच शुक्रवारच्या आरक्षण सोडतीदरम्यान तब्बल तीन तास आशा-निराशेचे रंग सर्वांनीच अनुभवले. (प्रतिनिधी)