शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुंचे रायफल प्रशिक्षण अमरावतीत

By admin | Updated: March 23, 2016 00:27 IST

स्थानिक पन्नालाल उद्यानात सन १९२७ मध्ये तंबू ठोकून हव्याप्र मंडळातर्फे उन्हाळी शिबिर घेण्यात आले होते.

श्री हव्याप्र मंडळात होता मुक्काम : शहिदांच्या पदस्पर्शाने अंबानगरी पावनइंदल चव्हाण  अमरावतीस्थानिक पन्नालाल उद्यानात सन १९२७ मध्ये तंबू ठोकून हव्याप्र मंडळातर्फे उन्हाळी शिबिर घेण्यात आले होते. त्यामध्ये काशी येथील रहिवासी शहीद शिवराम हरी राजगुरू यांनी शारीरिक शिक्षणासह रायफलचे शिक्षण पूर्ण करून ‘व्यायाम विशारद’ ही पदवी मिळविली होती.मंडळाच्या शिबिरात तरूण क्रांतिकारकांना बलोपासनेबरोबरच लाठी-काठी व इतर युद्धकलांमध्ये शिक्षण देण्याचा वर्ग काढावा, अशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू बाबारावांची इच्छा होती. त्यांनी राजगुरूंना काशी येथे एक पत्र पाठवून येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात तेथील शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून यावे, असे सुचविले होते. सुप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक व कलाकार कै. भालजी पेंढारकर यांनीसुद्धा त्यांच्या ‘साधा माणूस’ या पुस्तकात पान क्रमांक ७३ वर या गोष्टींचा उल्लेख केला आहे. पंजाबहून निघालेले अनेक क्रांतिकारक अमरावती, अमळनेर तर काही मुंबई अशा ठिकाणी विखुरले होते.या सर्वांचा एकमेकांशी संबंध ठेवण्यासाठी पोलिसांचे लक्ष जाणार नाही, अशा विश्वासू माणसाची आवश्यकता होती. अनेकदा हे काम भालबांकडे येत असे. अशाच एकाप्रसंगी भालबांची अमरावती येथील हनुमान व्यायाम शाळेत भगतसिंग वगैरेंची भेट झाली. त्यांच्या मनात ब्रिटिश राज्य हिंदूस्थानातून उधळून टाकण्यासाठी रोज काही नव्याच योजना निघत असत. हिवरखेड येथे रायफल प्रशिक्षणअकोट तालुक्यातील हिवरखेडचे राजस्थानी युवक लच्छूलाल हे आपली बंदूक घेऊन या उन्हाळी शिबिरासाठी आले होते. राजगुरुंनी याच बंदुकीचा उपयोग करून अचूक लक्ष्यवेधाचा सराव केला. त्यांची वृत्ती जहाल होती. स्वभाव बोलका व प्रचारी. त्यामुळे त्यावर्षीच्या वर्गात निरनिराळ्या प्रांतातून जे सार्वजनिक कार्यकर्ते आले होते. ते राजगुरूंकडे आकर्षित होत त्यांच्या भोवती नेहमी तरुणांचा गराडा पडलेला असे. मंडळावर त्यांची निष्ठा होती. त्यानंतर सुमारे दीड वर्षे राजगुरू हव्याप्र मंडळातच भूमिगत अवस्थेत राहिलेत.