शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

८३ कर्मचाऱ्यांकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:17 IST

पावसाचे वाहून जाणाऱ्या पाण्याचे भूगर्भात पुनर्भरण व्हावे, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी केली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत दोन आठवड्यांत नऊ विभागांतील ८३ कर्मचाºयांनी त्यांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविले.

ठळक मुद्देआयुक्तांच्या तंबीचा परिणाम : शहरात भूजल पुनर्भरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाचे वाहून जाणाऱ्या पाण्याचे भूगर्भात पुनर्भरण व्हावे, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी केली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत दोन आठवड्यांत नऊ विभागांतील ८३ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविले.शहराची लोकसंख्यावाढ झाल्याने पाण्याची मागणीदेखील वाढली आहे. त्यामुळे गरजेपोटी ठिकठिकाणी बोअर केल्या जात आहेत. परिणामी भूगर्भाची चाळण होत आहे. परिणामी भूजल स्तर खालावत आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण झाल्यास भूजलस्तर वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी प्रत्येक घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच पर्याय असल्याने नागरिकांत जलजागृती होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आयुक्त संजय निपाणे यांच्या मार्गदर्शनात अधिकाऱ्यांनी यासाठी कंबर कसली आहे. या अभियानाची सुरूवात आयुक्तांच्या निवासस्थानाहून करण्यात आली. त्यानंतर महापालिकेचे सर्व अधिकारी अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करण्यात आली.पावसाळ्यात रस्त्यांमध्ये वाहणारे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमाने साठविल्यास पाण्याचे दुर्भिक्ष नक्कीच कमी होईल. पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी विसंबून राहण्याची वेळ येणार नाही. शिवाय पाणी वर खेचण्यासाठी लागणाºया विजेच्या वापरात बचत होईल तसेच जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होणार असल्याची जागृती महापालिका प्रशासनाद्वारा करण्यात येत आहे.नऊ विभागांतील कर्मचाऱ्यांचा प्रतिसादभविष्यात उदभवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कार्यकारी अभियंता -२ कार्यालयातील १२ कर्मचारी, उपायुक्त (सामान्य) २, सांख्यिकी विभाग ३, उद्यान विभाग ५, उत्तर झोन क्रमांक १ मध्ये १३, पूर्व झोन क्रमांक ३६, एनयूएलएम विभाग १९, ससनर विभाग २१ व कार्यशाळा विभागातील २ कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविली आहे.शहराची भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोष खड्डा तयार करणे महत्त्वाचे आहे. महापालिकेतील ८३ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ही यंत्रणा त्यांच्या घरी बसविली आहेत.- संजय निपाणे,आयुक्त, महापालिका