शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पावसाची दडी, खरीप धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:00 IST

यंदाचा ४० टक्के पावसाळा आटोपला असताना ४५ टक्के पावसाची तूट आहे. सध्या दोन आठवड्यांपासून पेरण्या थबकल्या असल्याने किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. पेरणी झालेल्या तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणीची सावट आहे. सोयाबीन फुलोरावर यायच्या काळात पेरणी होणार असल्याने सरासरी उत्पादनात निश्चित घट होेणार आहे. यंदाच्या खरिपासाठी हा आपदा स्थितीचा काळ आहे. कृषिमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात पिकांचे आपत्कालीन नियोजन देण्यास गाफील कृषी विभाग ही शोकांतिका आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे सावट : दोन आठवड्यांपासून पाऊस गायब, दोन लाख हेक्टर नापेर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाचा ४० टक्के पावसाळा आटोपला असताना ४५ टक्के पावसाची तूट आहे. सध्या दोन आठवड्यांपासून पेरण्या थबकल्या असल्याने किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. पेरणी झालेल्या तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणीची सावट आहे. सोयाबीन फुलोरावर यायच्या काळात पेरणी होणार असल्याने सरासरी उत्पादनात निश्चित घट होेणार आहे. यंदाच्या खरिपासाठी हा आपदा स्थितीचा काळ आहे. कृषिमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात पिकांचे आपत्कालीन नियोजन देण्यास गाफील कृषी विभाग ही शोकांतिका आहे.यंदाच्या खरिपात रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर आर्द्राच्या मध्यात दाखल झालेल्या मान्सूनने दडी मारली ती सध्याही कायम आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्यानंतर मान्सून सक्रिय झाल्याची हाकाटी हवामान विभागाने उठवली. मात्र, पावसाने या भाकितांना दाद दिलेली नाही. पाऊस येण्याच्या आशेने जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र, चार दिवसांतच पावसाने दडी मारली. १५ दिवसानंतरही कायम आहे. त्यामुळे दोन लाख हेक्टर क्षेत्र अद्यापही नापेर आहे, पेरलेल्या तीन लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या उलटण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे आपत्कालीन नियोजन करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा सरासरी उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.यंदा १ जून ते १६ जुलै या कालावधीत पावसाची २८८.७ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५७ मिमी पाऊस झालेला आहे. म्हणजेच ४६ दिवसांत १३२ मिमी पाऊस कमी झालेला आहे. जिल्ह्यात पावसाची ५४ टक्के सरासरी आहे. सद्यस्थितीत चौदाही तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत. वरूड, भातकुली तालुक्यात पावसाची ३५ टक्क्यांच्या आत सरासरी आहे. काही तालुक्यांत २ जुलै, तर काही तालुक्यांत ४ जुलैपासून पावसात खंड राहिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, २५ जुलैनंतर मान्सून पुन्हा जिल्ह्यासह विदर्भात सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र, या अवधीत पिकांना व पेरणी झालेल्या क्षेत्रात मोड येण्याची शक्यता आहे. ही आगामी दुष्काळ अन् नापिकीची चाहूल असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचेपावसाळा १६ जुलैनंतर सुरू झाल्यास २५ टक्के बियाण्यांचा वापर जास्त करावा आणि रासायनिक खताचा वापर २५ टक्क्यांनी कमी करावा. संकरित वाणाखालील क्षेत्र कमी करून सुधारित वाणांचा वापर करावा. मूग व उडिदाची पेरणी टाळावी. देशी कपाशीचे सरळ वाण वापरावे. कपाशीच्या ओळी कमी करून त्यामध्ये एक किंवा दोन ओळी तुरीच्या घ्याव्यात. २५ जुलैपर्यत सोयाबीनची पेरणी व त्यात तुरीचे आंतरपीक घेता येईल.कृत्रिम पाऊस पाडणार केव्हा?पावसाचा खंड असल्यास शासन कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार. यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली असल्याचे सुतोवाच कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केले. विशेष म्हणजे, त्यांच्याच गृहजिल्ह्यात पाऊस ४६ टक्क्यांनी माघारला. वरूड मतदारसंघात आतापर्यंत फक्त ३१ टक्के पाऊस झाला. असे असताना कृषिमंत्री अन् जिल्हाधिकारी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, असा नागरिकांचा सवाल आहे.