शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानक की कचऱ्याचे आगार?

By admin | Updated: July 12, 2014 00:40 IST

अमरावती ‘मॉडेल’ रेल्वे स्थानक झाले. बडनेरा हे पूर्वीपासूनच जंक्शन आहे. त्यामुळे दोन्ही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ प्रचंड वाढली आहे.

श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेराअमरावती ‘मॉडेल’ रेल्वे स्थानक झाले. बडनेरा हे पूर्वीपासूनच जंक्शन आहे. त्यामुळे दोन्ही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. बडनेऱ्याहून देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्याकरिता रेल्वे गाड्यांची सोेय असल्याने दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी या दोन्ही स्थानकांवरून ये-जा करतात. प्रवाशांशिवाय या दोन्ही स्थानकांवर भिकारी, भामटे, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचासुध्दा मोठा वावर असतो. मात्र या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक फलाटावरील कचरा, दुर्गंधी व पानाच्या पिचकाऱ्यांकडेच आधी लक्ष वेधले जाते. रेल्वे प्रशासन नाही म्हणायला आपल्यापरीने स्वच्छतेकडे लक्ष पुरविते. परंतु प्रवाशांच्या सोईसाठी असलेल्या या स्थानकाचे मूळ रूप कायम ठेवण्यासाठी केवळ प्रशासनावरच अवलंबून न राहता साफसफाईची नैतिक जबाबदारी प्रवाशांचीदेखील नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कचरा कंटनेरचा वापर करण्यास टाळाटाळबडनेरा रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांचे आवागमन होते. रेल्वे स्थानक म्हटले की, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची वर्दळ आलीच. बडनेरा जंक्शनवर प्रवेश करताच विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या विशिष्ट लयबद्ध आरोळ्या कानावर पडतात. प्रवाशांच्या आणि रेल्वेच्या गदारोळात या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचीही लगबग सुरू असते. प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची खरेदी केली जाते. परंतु पदार्थांवरील प्लास्टिकचे आवरण, चहाचे ग्लासेस, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, उरलेले खाद्यपदार्थ, नासलेले अन्नदेखील चक्क रेल्वे ट्रॅकवर टाकले जातात. वास्तविक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने कचरा कंटेनरची सोय केली आहे. मात्र, प्रवाशांकडून आणि व्यावसायिकांकडूनही या कचरा कंटेनरचा वापर पाहिजे तसा केला जात नाही. प्रवाशांनी हा कचरा कंटेनरमध्ये टाकण्याची तसदी घेतल्यास रेल्वे फलाटांवरील साफसफाईचा ५० टक्के प्रश्न आपोआपच सुटू शकतो, हे मात्र निश्चित.